Home बातम्या शाओमी ची भेट : आॅफलाईन स्टोर्स वर पण मिळेल मी ए2, आता फ्लॅश सेलची वाट बघावी लागणार नाही

शाओमी ची भेट : आॅफलाईन स्टोर्स वर पण मिळेल मी ए2, आता फ्लॅश सेलची वाट बघावी लागणार नाही

शाओमी ने या महिन्याच्या सुरुवातीला भारतात आपली मी ए स्मार्टफोन सीरीज वाढवत मी ए2 स्मार्टफोन लॉन्च केला होता. शाओमी मी ए2 कंपनीचा एंडरॉयड वन स्मार्टफोन आहे जो लेटेस्ट एंडरॉयड अपडेट्स साठी नेहमीच तयार असेल. शाओमी ने मी ए2 अमेजॉन एक्सक्लूसिव म्हणून आणला होता, म्हणजे या फोनचा सेल मी डॉट कॉम व्यतिरिक्त फक्त अमेजॉन इंडिया वर होत होता. पण आता आपल्या फॅन्सना भेट देत शाओमी ने मी ए2 स्मार्टफोन आॅफलाईन बाजारात सादर केला होता. म्हणजे शाओमी मी ए2 आता आपल्या जवळच्या रिटेल स्टोर वरून विकत घेता येईल.

91मोबाईल्सला रिटेल मधील सूत्रांकडून समजले आहे की शाओमी मी ए2 स्मार्टफोन आता कपंनी कडून रिटेल स्टोर्स वर पण लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन विकत घेण्यासाठी आॅनलाईन सेल ची गरज नाही हा कोणत्याही रिटेल शॉप मधून विकत घेता येईल. शाओमी ने आपल्या आधीच्या स्मार्टफोन्स प्रमाणे मी ए2 ची किंमत पण आॅफलाईन बाजारत वेगळी ठेवली आहे. रिटेल स्टोर्स वर हा स्मार्टफोन 17,499 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

शाओमी ने मी ए2 16,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता जो 16 ऑगस्ट पासून आॅनलाईन शॉपिंग साइट वर सेल साठी लिस्ट झाला होता. आॅनलाईन बाजारा पेक्षा आॅफलाईन स्टोर्स वरून हा फोन विकत घेण्यासाठी यूजर्सना 500 रुपये जास्त द्यावे लागतील. हा फोन 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच मी ए2 गोल्ड, रोज गोल्ड, लेक ब्लू आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल.

शाओमी ने आपला हा स्मार्टफोन मेटल यूनिबॉडी डिजाईन वर सादर केला आहे. फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो वर 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.99-इंचाची आईपीएस फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. जी गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. शाओमीचे सर्व फोन मीयूआई वर चालतात पण मी ए2 कंपनी ने एंडरॉयड वन इंटिग्रेशन सह सादर केला आहे. म्हणजे यात तुम्हाला प्योर एंडरॉयड मिळेल. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो.

शाओमी मी ए2 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 12-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स486 प्राइमरी सेंसर आणि 20-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स376 सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. दोन्ही कॅमेरा सेंसर एफ/1.75 अपर्चर वाले आहेत तसेच एआई पोर्टरेट मोडला सपोर्ट करतात. त्याचप्रमाणे सेल्फी साठी मी ए2 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 20-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स376 फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या सेल्फी कॅमेरा मध्ये पण एआई टेक्नॉलजी आहे तसेच लो लाईट फोटोग्राफी साठी यासोबत फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

मी ए2 स्मार्टफोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्नोलॉजी पण आहे. डुअल सिम, 4जी वोएलटीई, वाईफाई व ब्लूटूथ 5.0 हे या फोन मध्ये कनेक्टिविटी आॅप्शन्स म्हणून उपलब्ध आहेत. शाओमी मी ए2 मध्ये पावर बॅकअप साठी 3,010एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी क्विक चार्ज 4.0 सपोर्ट सह सादर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शाओमी लवकरच बाजारात मी ए2 चा 6जीबी रॅम वेरिएंट पण घेऊन येणार आहे.