Home बातम्या 8 ऑगस्टला भारतात येत आहे शाओमी मी ए2, एवढी असू शकते इंडियन प्राइस

8 ऑगस्टला भारतात येत आहे शाओमी मी ए2, एवढी असू शकते इंडियन प्राइस

शाओमी ने काल ग्लोबल मंचावरून आपले दोन नवीन स्मार्टफोन मी ए2 आणि मी ए2 लाइट अंर्तराष्ट्रीय बाजारात सादर केले आहेत. शाओमी ने स्पेन मध्ये आयोजित एका ईवेंट च्या माध्यमातून हे फोंस अंर्तराष्ट्रीय बाजारात आणले आहेत. ग्लोबल लॉन्च होताच भारतातील शाओमी यूजर्स एकच प्रश्न विचारात आहेत की हा फोन भारतात कधी येईल. यूजर्स ची ही उत्सुकता पाहून शाओमी इंडिया हेड मनु कुमार जैन ने ग्लोबल लॉन्च नंतर काही तासांनी मी ए2 च्या इंडिया लॉन्च च्या तारखेची घोषणा केली आहे.

शाओमी इंडिया हेड मनु जैन ने आपल्या ट्वीटर हँडल वरून ट्वीट करून आॅफिशियल केले आहे की मी ए2 स्मार्टफोन येत्या 8 ऑगस्ट ला भारतात लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे शाओमी ने काल ग्लोबल मंचावर मी ए2 स्मार्टफोन दोन रॅम वेरिएंट मध्ये सादर केला आहे. यात 6जीबी रॅम आणि 4जीबी रॅम आॅप्शन आहे. हा फोन 4जीबी रॅम सह 32जीबी आणि 64जीबी मेमरी सह सादर झाले आहे तर 6जीबी रॅम वेरिएंट 128जीबी इंटरनल स्टोरेज सोबत लॉन्च करण्यात आला आहे. भारतात कोणते वेरिएंट लॉन्च होतील हे जाणून घेण्यासाठी वाट बघावी लागेल.

शाओमी मी ए2 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.99-इंचाच्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो. डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे. एकीकडे शाओमी चे सर्व फोन फोन मीयूआई वर चालतात पण मी ए2 कंपनी द्वारा एंडरॉयड वन इंटिग्रेशन सह सादर करण्यात आला आहे. म्हणजे यात तुम्हाला प्योर एंडरॉयड मिळेल. हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो आणि पुढील दोन वर्षे फोन ला लेटेस्ट एंडरॉयड चा अपडेट मिळेल. तसेच प्रोसेसिंग साठी मी ए2 मध्ये क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट देण्यात आला आहे.

शाओमी मी ए2 च्या कॅमेरा डिपार्टमेंट बद्दल बोलायचे तर फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल चा प्राइमरी आणि 20-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. फोन चा रियर कॅमेरा एआई पोर्टरेट मोड ला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी मी ए2 मध्ये 20-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन च्या सेल्फी कॅमेरा मध्ये पण एआई टेक्नोलॉजी आहे तसेच लो लाईट फोटोग्राफी साठी या सोबत फ्लॅश लाईट सपोर्ट देण्यात आला आहे.

मी ए2 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलजीला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट सोबत 3,010एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. किंमत पाहता 4जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट 249 यूरो, 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 279 यूरो तर 6जीबी रॅम/128 मेमरी वेरिएंट 349 यूरो मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. भारतीय करंसी नुसार या किंमती क्रमश: 20,000 रुपये, 22,500 रुपये आणि 28,100 रुपयांच्या आसपास आहेत.

भारतात शाओमी मी ए2 ला कंपनी याच किंमतीच्या आसपास लॉन्च करू शकते. मी ए2 च्या बेसिक वेरिएंट ची किंमत भारतीय बाजारत 18,000 रुपये असू शकते. पण भारतात लॉन्च होणार्‍या मी ए2 च्या वेरिएंट आणि किंमतीच्या ठोस माहितीसाठी सध्यातरी 8 ऑगस्ट ची वाट बघावी लागेल.