Home बातम्या शाओमीची मोठी खेळी, 6जीबी रॅम सह लॉन्च केला मी ए2

शाओमीची मोठी खेळी, 6जीबी रॅम सह लॉन्च केला मी ए2

भारतीय स्मार्टफोन मार्केट मधील नंबर वन कंपनी शाओमीने नुकताच आपल्या वेबसाइट वर कंपनीचा हिट स्मार्टफोन मी ए2 6जीबी रॅम सह लिस्ट केला होता. तर आज कंपनीने हा शानदार फोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. विशेष म्हणजे शाओमी मी ए2 चा 4जीबी रॅम वेरिएंटच आतापर्यंत देशात सेल साठी उपलब्ध होता पण आता हा स्मार्टफोन अजून दमदार करत शाओमीने मी ए2 ला 6जीबी रॅम ने अपग्रेड केले आहे.

शाओमी मी ए2 चा नवीन वेरिएंट 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. शाओमी ने मी ए2 चा नवीन वेरिएंट 19,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो शाओमी आॅफिशियल वेबसाइट सोबतच अमेझॉन इंंडिया वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल. कंपनी मर्यादित कालावधीसाठी हा वेरिएंट 2,000 रुपयांनी कमी म्हणजे 17,999 रुपयांमध्ये विकत आहे. तर मी ए2 चा 4जीबी रॅम वेरिएंट 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच हा वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

शाओमी ने आपला हा स्मार्टफोन मेटल यूनिबॉडी डिजाईन वर सादर केला आहे. फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो वर 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.99-इंचाची आईपीएस फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. जी गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. शाओमीचे सर्व फोन मीयूआई वर चालतात पण मी ए2 कंपनी ने एंडरॉयड वन इंटिग्रेशन सह सादर केला आहे. म्हणजे यात तुम्हाला प्योर एंडरॉयड मिळेल. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो.

शाओमी मी ए2 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 12-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स486 प्राइमरी सेंसर आणि 20-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स376 सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. दोन्ही कॅमेरा सेंसर एफ/1.75 अपर्चर वाले आहेत तसेच एआई पोर्टरेट मोडला सपोर्ट करतात. त्याचप्रमाणे सेल्फी साठी मी ए2 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 20-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स376 फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या सेल्फी कॅमेरा मध्ये पण एआई टेक्नॉलजी आहे तसेच लो लाईट फोटोग्राफी साठी यासोबत फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

मी ए2 स्मार्टफोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्नोलॉजी पण आहे. डुअल सिम, 4जी वोएलटीई, वाईफाई व ब्लूटूथ 5.0 हे या फोन मध्ये कनेक्टिविटी आॅप्शन्स म्हणून उपलब्ध आहेत. शाओमी मी ए2 मध्ये पावर बॅकअप साठी 3,010एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी क्विक चार्ज 4.0 सपोर्ट सह सादर करण्यात आली आहे.