इंडियन स्मार्टफोन बाजारात नंबर वन ठरलेली Xiaomi देशातील टेलीविजन बाजारात पण वेगाने पुढे जात आहे. कमी किंमतीत स्मार्टटीव्ही देणाऱ्या या कंपनीने Samsung, Sony व LG सारख्या ब्रँडसना चांगलीच टक्कर दिली आहे. Xiaomi चे Mi LED TV 4A PRO आणि Mi LED TV 4C PRO सारखे स्मार्टटीव्ही मॉडेल देशात लोकांना आवडले आहेत. तर आज आपल्या फॅन्सना भेट देत कंपनीने आपल्या स्मार्ट टेलीविजनच्या किंमती अजून कमी केल्या आहेत ज्या आजपासूनच नव्या किंमतींवर देशात सेलसाठी उपलब्ध होतील.
Xiaomi चे Mi LED TV 4A PRO आणि Mi LED TV 4C PRO स्मार्टटीव्ही मॉडेल भारतात ऑनलाईन शॉपिंग साइट सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध आहेत. कंपनीने या टेलीविजनच्या किंमती ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर आधीच कमी केल्या आहेत पण आता आपल्या फॅन्सना भेट देत कंपनीने ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण या स्मार्टटीव्हीच्या किंमती कमी केल्या आहेत.
Mi LED TV 4A PRO 43-इंच मॉडेल बद्दल बोलायचे तर Xiaomi ने हि स्मार्टटीव्ही 22,999 रुपयांमध्ये लॉन्च केली होती. या टीव्हीच्या किंमतीत कपात करत Xiaomi ने या मॉडेलचे मूल्य थेट 1,000 रुपयांनी कमी केले आहे. प्राइस कट नंतर Mi LED TV 4A PRO 43-इंच मॉडेल तुमच्या जवळच्या दुकानातून आता 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Mi LED TV 4A PRO 32-इंच मॉडेलचे मूल्य पण कंपनीने कमी केले आहे. हा स्मार्टटीव्ही मॉडेल भारतात 12,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर हा टीव्ही 12,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर आता ऑफलाईन बाजारात पण टीव्हीची किंमत 500 रुपयांनी कमी करत Xiaomi ने Mi LED TV 4A PRO 32-इंच मॉडेलची किंमत 12,499 रुपये केली आहे.
Mi LED TV 4C PRO 32-इंच मॉडेल वाल्या स्मार्टटीव्ही बद्दल बोलायचे तर कंपनीने हा टेलीविजन मॉडेल 12,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. Xiaomi ने या स्मार्टटीव्हीच्या मॉडेलची किंमत पण 500 रुपयांनी कमी केली आहे. या प्राइस कट नंतर Mi LED TV 4C PRO चा 32-इंच डिस्प्ले वाला मॉडेल 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Mi LED TV 4A PRO
Xiaomi Mi LED TV 4A PRO फुलएचडी एलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 60गीगाहर्ट्ज रिफ्रेश रेट सह 178-डिग्रीचा व्यूइंग एंगल देतो. Mi LED TV 4A PRO एंडरॉयड आधारित आहे जो शाओमी पॅचवॉल वर चालतो. तसेच कंपनीने Mi LED TV 4A PRO मध्ये बिल्ट इन क्रोम कॉस्ट पण दिला आहे.
Mi LED TV 4A PRO 64-बिट क्वॉड-कोर एमलॉजिग प्रोसेसर वर चालतो. हा स्मार्टटीव्ही 10 वॉटच्या 2 स्टीरियो स्पीकर्स सह येतो. तसेच कनेक्टिविटी ऑप्शन साठी या टीव्ही मध्ये 3 एचडीएमआई, 2 यूएसबी, 1 इथरनेट आणि 1 पीडीआईएफ पोर्ट सोबत ब्लूटूथ तसेच 2.4गीगाहर्ट्ज वाईफाई सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. Xiaomi या टीव्ही सोबत 7,00,000 तासांपेक्षा जास्त कंटेंट देत आहे. यूजर्स Mi LED TV 4A PRO मध्ये गूगल प्ले द्वारे आपले आवडीचे ऍप पण डाउनलोड करू शकतील.
Mi LED TV 4C PRO
Xiaomi Mi LED TV 4C PRO प्रो (32) शाओमी ने 1368 x 768 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 32-इंचाच्या एचडी डिस्प्ले सह सादर केली आहे. या टीवी मध्ये 1जीबी रॅम सह 8जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Mi LED TV 4C PRO पण एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम सोबत शाओमी च्या पॅचवॉल वर तसेच 64बिट एमलॉजिक क्वॉड-कोर चिपसेट वर चालते त्याचबरोबर ग्राफिक्स साठी यात माली-टी450 जीपीयू देण्यात आला आहे.
Mi LED TV 4C PRO पण वाईफाई व ब्लूटूथ सोबत 3 एचडीएमआई पोर्ट, 2 यूएसबी पोर्ट देण्यात आले आहेत त्याचबरोबर यात डीटीएस-एचडी सराउंट साउंड सपोर्ट वाले 20वॉल्ट चे स्टीरियो स्पीकर्स पण आहेत. या टेलीविजन मध्ये गूगल प्ले स्टोर मधून ऍप्स इंस्टाल पण करता येतात त्याचबरोबर यूट्यूब व गूगल प्ले चा पण वापर करता येतो. प्रो सीरीज च्या या तिन्ही टेलीविजन मध्ये क्रोमकॉस्ट आहे तसेच यूजर्स यात नेटफ्लिक्स, अमेजॉन प्राइम , वूट, झी5, हॉटस्टॉर, हंगामा असे 14 कटेंट प्लॅटफार्म वापरू शकतात.
