शाओमी ने सध्या भारतीय स्मार्टफोन बाजारावर कब्जा केला आहे आणि हळूहळू स्मार्ट टीवी लॉन्च करून सॅमसंग, सोनी व इतर कंपन्यांना मागे टाकण्याचे प्लानिंग करत आहे. कंपनी ने अलीकडेच आपले दोन नवीन स्मार्ट टीवी सादर केले होते. आपल्या फॅन्सना भेट देत शाओमी ने आता मी टीवी 4ए (43-इंच), मी एलईडी टीवी 4ए (43-इंच) आणि मी एलईडी टीवी 4ए प्रो (49-इंच) च्या किंमती कमी केल्या आहेत.
स्मार्ट टीवी विकत घेऊ इच्छित असलेल्या लोकांसाठी हि एक शानदार संधी आहे कारण ते कमी किंमतीत शाओमीचे स्मार्ट टीवी विकत घेऊ शकतात. कंपनी ने तिन्ही टीवींच्या किंमती 1,000 रुपयांनी कमी केल्या आहेत. टीवी च्या किंमतीतील कपातीची माहिती 91मोबाईल्सला रिटेल सोर्स कडू मिळाली आहे.
यानंतर मी टीवी 4ए (43-इंच), मी एलईडी टीवी 4ए (43-इंच) आणि मी एलईडी टीवी 4ए प्रो (49-इंच) च्या किंमती क्रमश: 22,999 रुपये, 22,999 रुपये आणि 30,999 रुपये आहे. अलीकडेच शाओमी ने भारतीय बाजारात आपले नवीन स्मार्ट टीवी लॉन्च केले होते. यात स्मार्ट टीवी मी एलईडी टीवी 4एक्स प्रो (55) आणि मी एलईडी टीवी 4ए प्रो (43) यांचा समावेश आहे. हे दोन्ही टेलीविजन एक्स प्रो सीरीजचे आहेत.
एक टेलीविजन 55-इंचाच्या मोठ्या स्क्रीन सह येतो तर दुसऱ्यात 43-इंचाचा लार्ज डिस्प्ले आहे. शाओमीचे दोन्ही स्मार्ट टीवी आज फ्लश सेल च्या माध्यमातून पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.
शाओमी मी एलईडी टीवी 4एक्स प्रो चे दोन्ही मॉडेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइट मी डॉट कॉम सोबत शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध केले गेले आहेत. 15 जानेवारी नंतर मी एलईडी टीवी 4एक्स प्रो (55) आणि मी एलईडी टीवी 4ए प्रो (43) पुढील फ्लॅश सेल साठी 22 जानेवारी येतील.
