Home बातम्या लॉन्च च्या आधी समोर आला शाओमी मी मॅक्स 3, डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्सचा झाला खुलासा

लॉन्च च्या आधी समोर आला शाओमी मी मॅक्स 3, डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्सचा झाला खुलासा

शाओमी आज पासून तिन दिवसांनी म्हणजे 19 जुलै ला आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन मी मॅक्स 3 टेक बाजारात सादर करणार आहे. शाओमी कडून हा फोन सध्या फक्त चीनी बाजारात लॉन्च केला जाईल. मी मॅक्स 3 च्या लॉन्च च्या आधीच आता फोन बद्दल एक मोठा लीक समोर आला आहे ज्यात फोन चा रिटेल बॉक्स आणि फोन ची रियल ईमेज शेयर करण्यात आली आहे. या फोटोज वरून फक्त फोन च्या डिजाईन ची माहिती मिळाली नाही तर सोबतच मी मॅक्स 3 च्या स्पेसिफिकेशन्स ची पण माहिती मिळाली आहे.

शाओमी मी मॅक्स 3 संबंधी हा लीक चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर शेयर करण्यात आला आहे. लीक मध्ये फोन चा फ्रंट आणि बॅक पॅनल दाखवण्यात आला आहे. बॅक पॅनल वर डुअल ​​वर्टिकल रियर आणि फिंगरप्रिंट सेंसर दिसत आहे तर फ्रंट डिस्प्ले वर सेटिंग मेन्यू ओपन आहे. फोटो वरून समजले आहे की फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो वाला डिस्प्ले दिला जाईल.

मी मॅक्स 3 च्या रिटेल बॉक्स वर लिहिण्यात आलेल्या स्पेसिफिकेशन्स वरून माहिती मिळाली आहे की फोन मध्ये 6.9-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात येईल. फोन च्या बॅक पॅनल वरील कॅमेरा सेटअप मध्ये 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर असल्याचे सांगण्यात आले आहेत. बाक्स नुसार पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात येईल.

शाओमी मी मॅक्स 3 च्या लीक झालेल्या रिटेल बॉक्स वर 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज लिहिण्यात आली आहे. पण कंपनी 3जीबी रॅम/32जीबी मेमरी आणि 6जीबी रॅम/ 128जीबी स्टोरेज वाले वेरिएंट पण लॉन्च करू शकते. एवढी माहिती असूनही फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी 19 जुलै ची वाट बघितली जात आहे.