Home बातम्या 10जीबी रॅम आणि स्लाइड आउट कॅमेरा असलेला शाओमी मी मिक्स 3 लॉन्च

10जीबी रॅम आणि स्लाइड आउट कॅमेरा असलेला शाओमी मी मिक्स 3 लॉन्च

शाओमीचा बहुप्रतीक्षित तसेच बहुच​र्चित स्मार्टफोन मी मिक्स 3 आज समोर आला आहे. कंपनीने आपला हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस मी मिक्स 3 टेक मंचावर सादर केला आहे. शानदार लुक व डिजाईन तसेच दमदार स्पेसिफिकेशन्स असलेला मी मिक्स 3 आज चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. मी मिक्स 3 आपल्या सीरीजच्या आधीच्या स्मार्टफोन्स प्रमाणे डिजाईन मध्ये अनोखा आहे तसेच शाओमी ने फोन मध्ये ताकदवान रॅम व प्रोसेसर दिला आहे.

शाओमी मी मिक्स 3 फुलव्यू डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्यात बेजल जवळपास नाहीतच. फोनच्या डिस्प्ले वर फिजिकल बटन नाही किंवा नॉच तसेच कॅमेरा सेंसर नाही. फोनच्या संपूर्ण फ्रंट पॅनल ​वर डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर ​वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

मी मिक्स 3 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 2340 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.39-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. शाओमी मी मिक्स 3 ट्रू बेजल लेस फोन आहे. शाओमीचा हा फोन स्लाइडर पॅनल सह येतो ज्यात सेल्फी कॅमेरा, ईयरपीस आणि अन्य सेंसर देनाय्त आले आहेत. हा स्लाइडर सेल्फी कमांड दिल्यावर फोन बॉडीच्या बाहेर येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मी मिक्स 3 ​डुअल रियर आणि डुअल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 आणि एफ/2.4 अपर्चर वाले 12-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देनाय्त आले आहेत ज्यात एआई क्षमता आहे. फोनचा रियर कॅमेरा वर्टिकल शेप मध्ये देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅश सह येतो. तसेच फोन मध्ये सेल्फी साठी एक कॅमेरा सेंसर 24-मेगापिक्सलचा आहे तर दुसरा कॅमेरा सेंसर 2-मेगापिक्सलचा आहे.

शाओमी मी मिक्स 3 कंपनीने एंडरॉयडच्या लेटेस्ट वर्जन वर सादर केला आहे जो मीयूआई च्या सर्वात फास्ट आॅपरेटिंग सिस्टम वर चालतो. तसेच प्रोसेसिंग साठी शाओमी ने मी मिक्स 3 मध्ये क्वालकॉमचा सर्वात नवीन चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 845 दिला आहे. मी मिक्स 3 तीन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे ज्यात 10जीबी पावरफुल रॅम सोबत 8जीबी तसेच 6जीबी रॅम वेरिएंटचा समावेश आहे.

किंमत पाहता मी मिक्स 3 चा 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंट 3299 युआन मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा 8जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 3599 युआन तर फोनचा 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंट 3999 युआन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या किंमती भारतीय करंसी नुसार क्रमश: 34,800 रुपये, 37,900 रुपये तसेच 42,100 रुपयांच्या आसपास आहेत.

या तिन्ही वेरिएंट व्यतिरिक्त शाओमी मी मिक्स 3 चा सर्वात ताकदवान वेरिएंट 10जीबी रॅम आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च करण्यात आला आहे. या वेरिएंटची किंमत 4999 युआन ठेवण्यात आली आहे जी इंडियन करंसी नुसार जवळपास 52,700 रुपये आहे.