Home बातम्या या चीनी कंपनीचे स्मार्टफोन्स होत आहेत आहेत क्रॅश, जाणून घ्या कारण

या चीनी कंपनीचे स्मार्टफोन्स होत आहेत आहेत क्रॅश, जाणून घ्या कारण

चायनीज स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi च्या स्मार्टफोन्स बद्दल अशी बातमी समोर येत आहे, ज्यामुळे युजर्स रागावले आहेत. कारण Mi, Redmi आणि Poco स्मार्टफोन युजर्सना बूटलूप समस्येचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्यांचा स्मार्टफोन वारंवार रीस्टार्ट होत आहे. तसेच दुसरीकडे काही युजर्स जे Redmi च्या फोन सोबत Airtel चे सिम वापरात आहेत त्यांचा फोन क्रॅश होण्याची बातमी समोर येत आहे. तसेच बूटलूपचा सामना करावा लागत आहे आणि फोन सतत रीस्टार्ट होत आहे.

कंपनी करत आहे तपास

शाओमीने या या समस्येचा सामना करणाऱ्या युजर्सना वादा केला आहे लवकरच हि समस्या फिक्स करण्यासाठी अपडेट जारी केला जाईल, जो प्रभावित युजर्स पर्यंत पोहोचेल. तसेच कंपनीने आपल्या विधानात म्हटले आहे कि ऍप अपडेट करताना कोडच्या काही लाईन्स मध्ये चूक झाल्यामुळे हि समस्या उत्पन्न झाली आहे.

एयरटेलने केले दुर्लक्ष

एयरटेलने पण स्पष्ट केले आहे कि या समस्येचे समाधान Xiaomi कडून केले जाईल. एयरटेलनुसार हि समस्या एयरटेल कडून नाही तर Xiaomi कडून आहे.

36 तासांमध्ये अपडेट जारी करेल शाओमी

Xiaomi ने एक स्टेटमेंट मध्ये असे पण म्हटले आहे कि पुढल्या आठवड्यांपर्यंत या समस्येचे निवारण केले जाईल. पण या अपडेटच्या आधी काळासाठी 36 तासांमध्ये कंपनी तात्पुरता अपडेट जारी करेल.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक युजर्सने याची माहिती दिली आहे कि MIUI 12.05 ग्लोबल स्टेबल रोम वर चालणाऱ्या स्मार्टफोन वर हि समस्या दिसली आहे. युजर्स कोणताही बदल करू शकत नाहीत कारण फोन वारंवार आपोआप रीबूट होत आहे. काही युजर्सना यामुळे आपला डेटा पण गमवावा लागला आहे.