Home बातम्या सॅमसंग-सोनीला शाओमीचा झटका, लॉन्च केला खूप स्वस्त स्मार्ट टीवी

सॅमसंग-सोनीला शाओमीचा झटका, लॉन्च केला खूप स्वस्त स्मार्ट टीवी

इंडिया स्मार्टफोन मार्केट मध्ये स्वतःला नंबर वन म्हणून सिद्ध केलेल्या टेक कंपनी शाओमी ने आज भारतात आपल्या रेडमी सीरीजचे दोन नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 7 प्रो आणि रेडमी नोट 7 लॉन्च केले आहेत. स्मार्टफोन सोबत शाओमी देशात टीवी बाजारात पण हलचल निर्माण करण्यास तयार आहे. टेलीविजन कंपन्यांना मोठी टक्कर देत हुएशाओमी इंडिया ने भारतात आज अजून एक नवीन स्मार्टटीवी लॉन्च केला आहे. शाओमीने मी एलईडी टीवी 4ए प्रो (32-इंच) बाजारात आणला आहे जो 12,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

मी एलईडी टीवी 4ए प्रो (32-इंच) चे स्पेसिफिकेशन्स
शाओमीचा हा नवीन स्मार्टटीवी 1जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे. या टीवी मध्ये 8जीबी इंटरनल स्टोरेज आहे. मी एलईडी टीवी 4ए प्रो चा नवीन मॉडेल पण एंडरॉयड आधारित आहे जो शाओमी पॅचवॉल वर चालतो. तसेच कंपनी ने मी एलईडी टीवी 4ए प्रो मध्ये बिल्ट इन क्रोम कॉस्ट पण दिला आहे. शाओमीने या टीवी मध्ये 32 इंचाचा डिस्प्ले दिला आहे जो एचडी रेडी आहे.

हा स्मार्टटीवी 20 वॉट स्टीरियो स्पीकर्स सह येतो. तसेच कनेक्टिविटी ऑप्शन साठी या टीवी मध्ये ब्लूटूथ, एचडीएमआई, यूएसबी, इथरनेट आणि पीडीआईएफ सारखे फीचर्स आहेत. शाओमी या टीवी सह 7,00,000 तासांपेक्षाही जास्त कंटेंट दिला आहे. यूजर्स मी एलईडी टीवी 4ए प्रो मध्ये गूगल प्ले च्या माध्यमातून आपल्या आवडीचे ऍप पण डाउनलोड करू शकतील.

मी स्पोर्ट्स ब्लूटूथ ईयरफोन बेसिक
शाओमी ने दोन नवीन स्मार्टफोन आणि एका नवीन स्मार्टटीवी सोबत इंडियन मार्केट मध्ये नवीन ब्लूटूथ ईयरफोन पण लॉन्च केले आहेत. हे ईयरफोन गूगल असिस्टेंट सह काम करतात. कपंनी ने आपल्या नवीन ईयरफोनला आईपीएक्स4 रेटिड बनवले आहे ज्यामुळे हे पाणी आणि घामामुळे खराब होत नाहीत. तसेच मी स्पोर्ट्स ब्लूटूथ ईयरफोन बेसिक एकदा चार्ज केल्यास हे 9 तासांचा बॅकअप देऊ शकतात. शाओमी ने मी स्पोर्ट्स ब्लूटूथ ईयरफोन बेसिक 1,499 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे.