शाओमी आतापर्यंत अनेक बाबतीती टेक विश्वातील दिग्गजांना टक्कर देत आली आहे. यावेळी कंपनीचे प्लानिंग एक पाऊल पुढे जात फोल्डेबल फोन लॉन्च करण्याचे आहे. शाओमीच्या आगामी फोल्डेबल फोनचा एक वीडियो ट्विटर वर आला आहे. या वीडियो मध्ये टॅबलेट सहज घडी होताना दाखवण्यात आला आहे. याची माहिती प्रसिद्ध लीकस्टर इवन ब्लास ने आपल्या ट्विटर हॅण्डल वर दिली आहे.
इवन ब्लास ने ट्विटर वर एक 20 सेकंदाचा वीडियो शेअर केला आहे. या वीडियो मध्ये जो डिवाइस आहे तो पूर्णपणे घडी होताना दिसत आहे. ट्विट मध्ये इवन ने म्हटले आहे कि “या वीडियो किंवा डिवाइसच्या प्रामाणिकपणावर मी काहीच बोलू शकत नाही, पण हा शाओमी ने बनवलेला कथित स्मार्टफोन आहे. हा एक नवीन फोन आहे कि फेक आहे?”
Can't speak to the authenticity of this video or device, but it's allegedly made by Xiaomi, I'm told. Hot new phone, or gadget porn deepfake? pic.twitter.com/qwFogWiE2F
— Evan Blass (@evleaks) January 3, 2019
शाओमीच्या आधी सॅमसंग, ओपो, एलजी व हुआवई ची पण बातमी समोर आली आहे कि या कंपन्या फोल्डेबल स्मार्टफोन वर काम करत आहेत. सॅमसंग बद्दल बोलले जात आहे कि कंपनी पुढल्या महिन्यात सीईएस 2019 ईवेंट मध्ये आपला फोल्डेबल फोन अधिकृतपणे सादर करेल. पण या सर्व कंपन्यांचे फोन एकाच बाजूने उघडतील तसेच बंद होतील. तर ऍप्पलच्या पेटेंट मध्ये खुलासा झाला होता कि त्यांचा फोन इतका ऍडव्हान्स असेल जो दोन्ही बाजूने घडी करता येईल.
ऍप्पल ने दोन्ही बाजूने वाकणाऱ्या फोन साठी एक पेटेंट नोंदवले होते. ऍप्पल द्वारा फाइल केल्या गेलेल्या या पेटेंट मध्ये अश्या टेक्नॉलॉजीचा समावेश आहे जी फोल्डेबल फोन बनवेल. ऍप्पलची टेक्नॉलॉजी इतरांपेक्षा वेगळी असण्याचे कारण म्हणजे पेटेंट अनुसार कंपनीचा आईफोन एखादया कागदाप्रमाणे दोन्ही बाजूने घडी करता येईल.
