शाओमी मागच्या अनेक दिवसांपासून आपल्या प्रीमियम फोल्ड आणि फ्लिप स्मार्टफोनवर काम करत आहे. सांगण्यात आले आहे की यावर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये ब्रँड Xiaomi MIX Fold 4 ला चीनमध्ये लाँच करेल. तसेच, सादर होण्याच्या आधी याला 3 सी सर्टिफिकेशन वेबसाईटवर स्पॉट करण्यात आले आहे. फोनमध्ये सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी असण्याची माहिती मिळाली आहे. चला, पुढे लिस्टिंगला सविस्तर जाणून घेूऊया.
Xiaomi MIX Fold 4 3 सी लिस्टिंग
- माय स्मार्ट प्राईसने 3C सर्टिफिकेशन डेटाबेसवर मॉडेलनंबर 24072PX77C सह एका आगामी Xiaomi स्मार्टफोनला स्पॉट केले आहे.
- लिस्टिंगवरून माहिती मिळाली आहे की यात सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीला सपोर्ट मिळेल. यामुळे हा Xiaomi MIX Fold 4 असण्याची शक्यता आहे.
- Xiaomi MIX Fold 4 मध्ये 67W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळण्याची गोष्ट पण समोर आली आहे.
- 3 सी साईटवर मॉडेल नंबर MDY-15-EQ असणाऱ्या चार्जर वापर टेस्टिंगसाठी झाला आहे हा चार्जर 15W (5V/3A) आणि 67W (20V/3.25A) फास्ट चार्जिंग असलेला आहे.
- मॉडेल नंबर आणि बॅटरी चार्जिंग व्यतिरिक्त लिस्टिंगमध्ये फोल्डेबल डिव्हाईस बाबत इतर कोणतीही माहिती मिळाली नाही.
Xiaomi MIX Fold 4 चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)
- गेल्या महिन्यात आलेल्या लीकनुसार Xiaomi MIX Fold 4, HONOR Magic V2 पेक्षा पातळ असेल. जो वर्तमान मध्ये सर्वात पातळ फोल्डेबल आहे. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की नवीन मिक्स फोल्ड 4 लाँच झाल्यानंतर सर्वात पातळ फोल्डेबल बनू शकतो.
- Xiaomi MIX Fold 4 ला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसरसह सादर होण्याची माहिती समोर आली आहे.
- मोबाईलमध्ये 1/1.55-इंचाचा सेन्सर आकार आणि ऑप्टिकल फोटो स्टेबिलायजेशन सह 50MP चा रिअर कॅमेरा असण्याची संभावना आहे. हेच नाही तर यात 60MP 2x टेलीफोटो कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाईड कॅमेरा आणि 10MP 5x पेरिस्कोप कॅमेरा पण दिला जाऊ शकतो.
- Xiaomi MIX Fold 4 कथितरित्या IP रेटिंग असलेला कंपनीचा पहिला फोल्डेबल असू शकतो.
