Home बातम्या शाओमी बनवणार ‘मेक इन इंडिया’ स्मार्ट टीवी, प्रत्येक महिन्याला होईल 55,000 टीवींची निर्मिती

शाओमी बनवणार ‘मेक इन इंडिया’ स्मार्ट टीवी, प्रत्येक महिन्याला होईल 55,000 टीवींची निर्मिती

शाओमी ने काही काळापूर्वी भारतात आपल्या स्मार्ट टीवी ची सुरवात करत मी टीवी सादर केली होती. शाओमी स्मार्टफोन प्रमाणे ही स्मार्ट टीवी पण लोकांना खुप आवडली आणि प्रत्येक सेल मध्ये यांची मागणी इतकी जास्त होती की ही आउट आॅफ स्टॉक होत होती. मागच्या काही दिवसांमध्ये देशात इंपोर्ट ड्यूटी वाढल्यामुळे शाओमी ने मी एलईडी टी 4 च्या किंमतीत 5,000 रूपयांची वाढ केली होती. पण आता लवकरच शाओमी ची स्मार्ट टीवी आधीपेक्षा कमी किंमतीत मिळायला सुरवात होईल. बातमी आली आहे की शाओमी ‘मेक इंन इंडिया’ अंतर्गत आता भारतातच स्मार्ट टीवी ची निर्मिती करणार आहे.

इकोनॉमिक टाइम्स च्या रिपोर्ट नुसार शाओमी आता भारतातच स्मार्ट टीवी ची निर्मिती करणार आहे. बातमी नुसार ऑगस्ट मध्ये हे स्मार्ट टीवी भारतीय बाजारात येतील. सुरवातीला शाओमी 32-इंच आणि 43-इंच तसेच 55-इंच वाल्या मी एलईडी टीवी मॉडेल्स चे प्रोडक्शन करेल, त्यानंतर इतर नवीन प्रोडक्ट्स पण बनवण्यात येतील. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की भारतातील प्लांट मध्ये प्रोडक्शन सुरू झाल्यास शाओमी प्रत्येक महिन्याला जवळपास 55,000 टीवी यूनिट निर्माण करेल.

शाओमी ने भारतात स्मार्ट टीवी बनवण्यासाठी डिक्सन टेक्नोलॉजीस सोबत हात मिळवणी केली आहे. या कंपनी सोबत मिळून तिरुपती मधील प्लांट मध्ये शाओमी पुढील महिन्यापासूनच स्मार्ट टीवी चे निर्माण सुरू करेल. विषेश म्हणजे डिक्सन सोबत शाओमी ने 32-इंच आणि 43-इंच वाल्या स्मार्ट टीवी साठी भागीदारी केली आहे तर 55-इंच वाल्या मी एलईडी टीवी साठी शाओमी ने फॉक्सकॉन ची मदत घेतली आहे.

फॉक्सकॉन च्या चेन्नई मधील प्लांट मध्ये शाओमी चे 55-इंच वाल्या मी एलईडी टीवी ची निर्मिती होईल. विशेष म्हणजे फॉक्सकॉन देशात सोनी ब्रांड च्या टेलीविजन ची पण निर्मिती करत आहे. शाओमी भारतात आपले स्मार्टटीवी असेम्बल करेल. शाओमी च्या निर्णयामुळे देशात कंपनी च्या स्मार्ट टीवी ची किंमत कमी होईलच त्याचबरोबर यांचा पुरवठा पण वेगाने होईल. तर दुसरीकडे बाजारतील स्पर्धा वाढल्याने इतर टेलीविजन कंपन्या पण आपल्या प्रोडक्ट्स च्या किंमती कमी करू शकतात.