चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी ने यावर्षी आपल्या नवीन सब-ब्रँड पोको अंतर्गत पोको एफ1 फ्लॅगशिप डिवाइस लॉन्च केला होता. कमी किंमतीती शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स असलेल्या या स्मार्टफोन नंतर कंपनी आपला नवीन स्मार्टफोन सादर करण्यासाठी तयार आहे. याची माहिती पोको चे जनरल मॅनेजर मनमोहन ने आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाउंट वरून दिली आहे.
मनमोहन ने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडल वरून एक ट्विट केला आहे ज्यात त्यांनी सांगितले आहे की “गेला आठवडा आमच्यासाठी खास होता. पोको एफ1 साठी आम्ही अनेक अवॉर्ड आणि एप्रिशियेशन मिळाले. असे वाटत होते की क्रिसमस वेळेपूर्वीच आला आहे.”
त्यांनी पुढे लिहिले आहे की “पण हे इथेच थांबणार नाही. आमच्याकडे तुमच्यासाठी अजून एक सरप्राइज आहे. नवीन पोको फोन लॉन्च होणार आहे. हा कधी येईल याचा अंदाज तुम्ही लावू शकतात का?”
Last week's been crazy! #POCOF1 has won awards & appreciation one after the other and #Christmas seems to have come early! @MKBHD @TheMrPhone @91mobiles @AndroidAuth
But, that's not all.
I have a surprise for all of you. A #NewPOCO is coming. Can you guess when? ?— C Manmohan (@cmanmohan) December 24, 2018
हि माहिती मनमोहन यांनी क्रिसमसच्या वेळी दिली आहे. सहाजिकच हि पोकोच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सध्या पोकोच्या नवीन स्मार्टफोनच्या लॉन्चची माहिती समोर आली आहे. अशा आहे की पोकोचा आगामी स्मार्टफोन यावर्षी लॉन्च केल्या गेलेल्या एफ1 चा अपग्रेडेड वेरिएंट असेल. अधिकृतपणे या आगामी डिवाइसबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.
पोको फोन बद्दल बोलायचे तर हा कमी किंमतीत चांगले स्पेसिफिकेशन देतो. कंपनी ने पोको एफ1 चे तीन वेरियंट सादर केले आहेत जे 4जीबी, 6जीबी आणि 8जीबी रॅम वेरियंट सह येतात. फोन मध्ये 6.18-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 9.6 वर चालतो. तसेच फोटोग्राफी साठी फोन मध्ये 12एमपी+5एमपी चा रियर कॅमेरा आहे. तसेच फ्रंट कॅमेरा 20एमपी चा देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह लॉन्च होणारा हा सर्वात स्वस्त फोन आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट सह क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
