शाओमी ने कालच आपल्या होम मार्केट मध्ये दोन नवीन स्मार्टफोन रेडमी 6 आणि रेडमी 6ए लॉन्च केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन लो बजट सेग्मेंट मध्ये सादर करण्यात आला आहे जो मीडियाटेक च्या चिपसेट सह येतो. तसेच आता बातमी मिळाली आहे की कंपनी लवकरच आपले हे स्मार्टफोन भारतीय बाजारात पण आणू शकते. बातमी नुसार भारतात पण हे दोन्ही स्मार्टफोन मीडियाटेक चिपसेट वर लॉन्च होतील.
मीडिया रिपोर्ट नुसार शाओमी आपल्या लेटेस्ट स्मार्टफोन रेडमी 6 आणि रेडमी 6ए भारतीय बाजारात पण लॉन्च करेल. मीडियाटेक चे चीफ फाइनेंशियल आॅफिसर डेविड कू ने दिलेल्या एका विधाना नंतर ही बातमी अजून निश्चित होताना दिसत आहे. विशेष म्हणजे वर्ष 2014 मध्ये एरिक्सन कंपनी ने शाओमी वर काही आरोपां सह केस केली होती, त्यानंतर शाओमी भारतात मीडियाटेक चिपसेट सह फोन लॉन्च करू शकत नव्हती आणि याच कारणामुळे शाओमी खुप काळापासून फक्त क्वालकॉम चिपसेट सह फोन घेऊन येत आहे.
पण आता ताजा अपडेट नुसार शाओमी आणि एरिक्सन मधील हा वाद आता सुटणार आहे आणि ही केस संपताच शााओमी भारतीय बाजारात मीडियाटेक चिपसेट वर चालणारे फोन लॉन्च करू शकेल. बोलले जात आहे की शाओमी कंपनी रेडमी 6 आणि रेडमी 6ए स्मार्टफोन सह इंडियन मार्केट मध्ये मीडियाटेक चिपसेट सह वापसी करेल. डेविड कू ने पण आपल्या वक्तव्यात स्पष्ट सांगितले आहे की शाओमी भारतात मीडियाटेक चिपसेट वाला फोन लॉन्च करेल.
लक्षात असू दे की वर्ष 2014 मध्ये लॉन्च झालेला रेडमी नोट शाओमी चा शेवटचा मीडियाटेक चिपसेट वाला फोन होता जो भारतात लॉन्च झाला. हा फोन एमटी6592 मीडियाटेक चिपसेट वर चालत होता. तसेच रेडमी सीरीज च्या नवीन स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर रेडमी 6 हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो तर रेडमी 6ए ए22 चिपसेट वर लॉन्च करण्यात आला आहे. पण हे दोन्ही स्मार्टफोन भारतीय बाजारात येण्यासाठी थोडी वाट बघावी लागेल.
शाओमी रेडमी 6 आणि रेडमी 6ए चे फुल फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
