खुप कमी वेळा असे झाले आहे जेव्हा शाओमी ने एकाच वेळी एका पेक्षा जास्त फोन मॉडेल लॉन्च केले आहेत. कधी कधी कंपनी ने दोन मॉडेल सादर केले आहेत पण आज कंपनी ने आपल्या रेडमी 6 सीरीज मध्ये एक साथ 3 मॉडेल सादर केले आहेत. शाओमी ने रेडमी 6ए, रेडमी 6 आणि रेडमी 6 प्रो सादर केले आहेत. सर्वात खास बाब म्हणजे यातील दोन, शाओमी रेडमी 6ए आणि रेडमी 6 मीडियाटेक चिपसेट सह उपलब्ध आहेत. पहिल्यांदाच कंपनी चे मीडियाटेक चिपसेट वाले फोन भारतात सेल साठी उपलब्ध होतील तर रेडमी 6 प्रो क्वालकॉम चिपसेट वर आधारित आहे. रेडमी 6 प्रो बद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.
याआधी शाओमी ने भारतात रेडमी नोट 3जी मॉडेल मीडियाटेक चिपसेट वर सादर केला होता पण तो फोन विक्रीच्या आधीच वादग्रस्त ठरला होता आणि कधीच सेल साठी आला नाही. परंतु आता पुन्हा एकदा शाओमी ने मीडियाटेक आणला आहे आणि दोन मॉडेल सादर केले आहेत. शाओमी रेडमी 6ए पाहता या फोन मध्ये 5.45—इंचाची एचडी+ (720 x 1440 पिक्सल रेजल्यूशन) वाली स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन 18:9 आसपेक्ट रेशियो वाल्या फुल व्यू डिसप्ले सह उपलब्ध आहे. पण कंपनी ने प्रोटेक्शन ची माहिती दिली नाही. शाओमी रेडमी 6 च्या माहितीसाठी इथे क्लिक करा.
शाओमी रेडमी 6ए मीयूआई 9 वर चालतो जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो आधारित आहे. कंपनी ने याला मीडियाटेक हेलिया ए22 चिपसेटची ताकद दिली आहे. फोन मध्ये 2.0गीगाहट्र्जचा प्रोसेसर आहे जो या बजेट मध्ये खुप खास आहे.
भारतीय बाजारात हा फोन 2जीबी आणि 3जीबी रॅम मेमरी सह उपलब्ध आहे. त्याचबरोबर तुम्हाला 16जीबी आणि 32जीबी मेमरी मिळेल. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 216जीबीचे कार्ड वापरू शकता.
कॅमेरा पाहता शाओमी रेडमी 6ए मध्ये 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर सह येतो. तसेच फास्ट फोकस साठी यात पीडीएएफ सपोर्ट आहे. फोनचा सेल्फी कॅमेरा 5मेगापिक्सल चा आहे आणि यात पण तुम्हाला एफ/2.2 अपर्चर मिळेल.
डाटा व कनेक्टिविटी पाहता शाओमी रेडमी 6ए मध्ये डुअल सिम सह 4जी वोएलटीई सपोर्ट आहे. त्याचबरोबर वाईफाई आणि ब्लूटूथ पण मिळेल. पण यात फिंगरप्रिंट स्कॅनर मिळणार नाही. पावर बॅकअप साठी कंपनी ने यात 3,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
भारतीय बाजारात शाओमी रेडमी 6ए च्या 2जीबी रैम + 16जीबी मेमरी वेरियंट ची किंमत 5,999 रुपये आहे. तर 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी वाला वेरियंट 6,999 रुपयांमध्ये विकत घेतला जाऊ शकतो. हा फोन 19 सप्टेंबर पासून सेल साठी आॅनलाइन स्टोर अमेजॉन आणि मी इंडिया स्टोर वर उपलब्ध होईल.
