Home बातम्या शाओमीचा स्वस्तातला फोन रेडमी 7, 18 मार्चला होईल लॉन्च

शाओमीचा स्वस्तातला फोन रेडमी 7, 18 मार्चला होईल लॉन्च

शाओमी बद्दल आधीच समजले आहेत कि कंपनी आपल्या रेडमी सीरीजच्या आगामी स्मार्टफोन रेडमी 7 वर काम करत आहे. रेडमी नोट 7 च्या यशानंतर आता रेडमी 7 च्या लॉन्चची वाट बघितली जात आहे. रेडमी 7 बद्दल आता अनेक लीक्स समोर आले आहेत ज्यात फोनचा लुक, फीचर आणि डिजाईन बद्दल बरीच माहिती मिळाली आहे. तसेच आता रेडमी 7 संबंधित अजून एक ताजा माहिती समोर आली ज्यात फोनच्या लॉन्च डेटचा खुलासा झाला आहे. हा खुलासा इतर कोणी केला नसून स्वतः रेडमीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. रेडमी 7 च्या लॉन्च डेटची माहिती देत ब्रँडच्या जीएम नी सांगितले कि येत्या 18 मार्चला रेडमी 7 जागतिक मंचावर लॉन्च केला जाईल.

रेडमी 7 लॉन्च डिटेल
शाओमी कंपनीच्या रेडमी ब्रँडच्या जनरल मॅनेजर लू वेईबिंग ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वरून रेडमी 7 च्या लॉन्च डेटची माहिती दिली आहे. लू ने वेईबो वर रेडमी 7 चा लॉन्च पोस्टर अधिकृतपणे शेयर केला आहे. या पोस्टर मध्ये रेडमी 7 च्या फोटो सोबत 18 मार्चची लॉन्च डेट पण लिहिण्यात आली आहे. या पोस्ट वरून स्पष्ट झाले आहे कि 18 मार्चला रेडमी 7 चीनी मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल. तसेच रेडमी 7 च्या इंडिया लॉन्च मध्ये थोडा वेळ लागू शकतो. आशा आहे कि चीन मध्ये हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल.

रेडमी 7 डिजाईन
रेडमीचे जनरल मॅनेजर लू वेईबिंग ने आपल्या पोस्ट मधून रेडमी 7 ची लॉन्च डेट सांगितलीच आहे सोबत फोनचा फोटो शेयर करत याच्या लुक आणि डिजाईनची माहिती पण सार्वजनिक केली आहे. हा फोन रेडमी नोट 7 प्रमाणे डॉट-ड्रॉप नॉच सह सादर केला जाईल. फोनच्या तुम्ही कडांवर बारीक बेजल्स दिसत आहेत तर खालच्या बाजूला अपेक्षेप्रमाणे मोठी चीन आहे. डिस्प्लेच्या वर नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा आहे.

रेडमी 7 चा बॅक पॅनल शाइनी दिसत आहे ज्यावर दुसऱ्या फोनची सावली दिसत आहे. बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये ​डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्याच्या खाली फ्लॅश लाईट आहे. रेडमी 7 च्या बॅक पॅनल वरच सेंटर मध्ये फिंगरप्रिंट सेंसर आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आले आहेत. तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. यूएसबी पोर्ट फोनच्या खालच्या पॅनल वर दिला जाईल.

रेडमी 7 स्पेसिफिकेशन्स
शाओमीने रेडमी 7 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही पण समोर आलेल्या लीक्सनुसार हा फोन 6.26-इंचाच्या एचडीप्लस टीएफटी डिस्प्ले वर सादर केला जाईल. रेडमी 7 एंडरॉयड ओएस एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई 10 सह बाजारात येईल. तसेच फोन मध्ये 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला आक्टा-कोर प्रोसेसर मिळेल सोबतच हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालेल.

समोर आलेल्या लीक्सनुसार रेडमी 7 तीन वेरिंएट्स मध्ये लॉन्च केला जाईल. ज्यात 2जीबी रॅम, 3जीबी रॅम आणि 4जीबी रॅम सह 16जीबी मेमरी, 32जीबी मेमरी आणि 64जीबी की मेमरी मिळेल. लीकनुसार फोटोग्राफी साठी रेडमी 7 च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा मिळू शकतो.

रेडमी 7 मध्ये 3.5एमएम जॅक दिसत आहे जो फोनच्या वरच्या पॅनल वर आहे. तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत रेडमी 7 मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी दिली जाईल. विशेष म्हणजे शाओमीने अजूनतरी रेडमी 7 च्या लॉन्च डेट व्यतिरिक्त इतर कोणतीही आफिशियल माहिती दिली नाही. त्यामुळे समोर आलेल्या स्पेसिफिकेशन्स वर 18 मार्च पर्यंत विश्वास ठेवता येणार नाही.

सोर्स