Home बातम्या फक्त 5,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला शाओमीचा अजून एक स्वस्त फोन Redmi 7A, फीचर्स आहेत शानदार

फक्त 5,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला शाओमीचा अजून एक स्वस्त फोन Redmi 7A, फीचर्स आहेत शानदार

Xiaomi ने आज भारतात Redmi 7A अधिकृतपणे लॉन्च केला आहे. शाओमीचा हा बजेट स्मार्टफोन चीन मध्ये दोन महिन्यांपूर्वी लॉन्च केला गेला आहे. चीन मध्ये लॉन्च झाल्यानंतर अंदाज लावला जात होता कि कंपनी हा लवकरच भारतात लॉन्च करू शकते. शाओमी रेडमी ए सीरीजला मिळणार शानदार प्रतिसाद पाहून हा स्मार्टफोन सादर केला गेला आहे.

किंमत आणि उपलब्धता

Redmi 7A च्या 2जीबी रॅम आणि 16जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 5,999 रुपये आणि 2जीबी रॅम व 32जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत 6,199 रुपये आहे. फोनचा सेल 11 जुलै पासून ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट सोबतच कंपनीच्या वेबसाइट आणि मी होम स्टोर वर होईल. तसेच जर तुम्ही हा फोन जुलै मध्ये विकत घेतला तर 2जीबी+16जीबी 5,799 आणि 2जीबी+32जीबी स्टोरेज 5,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन पाहता यात 5.45-इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 18:9 आहे. तसेच फोन मध्ये 2.0 गीगार्ट्ज क्वॉलकॉम 439 एसओसी प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबतच डिवाइस मध्ये 2जीबी रॅम सह 16जीबी आणि 2जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंट सादर करण्यात आला आहे. यूजर फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवू शकतात.

तसेच फोटोग्राफी साठी रेडमी 7ए च्या मागे 12 मेगापिक्सलचा सोनी IMX 486 सेंसर आहे. तसेच फोन मध्ये सेल्फी साठी फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे जो AI फेस अनलॉक सपॉर्ट सह येतो.

ऑपरेटिंग सिस्टम बद्दल बोलायचे तर यात अँड्रॉइड 9 पाई वर बेस्ड MIUI 10 ओएस देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. फोन मॅट ब्लॅक, मॅट ब्लू आणि मॅट गोल्ड कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे. तसेच फोन मध्ये वायरलेस एफएम रेडियो सपोर्ट देण्यात आला आहे. फोन स्प्लॅश प्रूफ आहे, ज्याचा अर्थ असा कि पाण्याच्या शिंतोड्यांचा यावर काहीच परिणाम होणार नाही.