Home बातम्या 5000एमएएच बॅटरी आणि डुअल रियर कॅमेऱ्यासह Xiaomi Redmi 8A Pro झाला लॉन्च

5000एमएएच बॅटरी आणि डुअल रियर कॅमेऱ्यासह Xiaomi Redmi 8A Pro झाला लॉन्च

फेब्रुवारी महिन्यात टेक कंपनी Realme ने भारतात आपला लो बजेट स्मार्टफोन Realme C3 लॉन्च केला होता. या फोनने 6,999 रुपयांमध्ये एंट्री घेतली होती जो डुअल रियर कॅमेरा आणि 5000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो रियलमी सी3 लॉन्चच्या काही दिवसानंतर या मोबाईलला टक्कर देत Xiaomi ने पण आपला लो बजेट स्मार्टफोन Redmi 8A Dual लॉन्च केला होता. Xiaomi Redmi 8A Dual कंपनीने 6,499 रुपयांमध्ये लॉन्च केला होता जो 5000एमएएच बॅटरी आणि डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. आता अंर्तराष्ट्रीय बाजारात स्वस्त फोन सादर करत शाओमीने Redmi 8A Pro लॉन्च केला आहे. हा फोन रेडमी 8ए डुअल सारख्या स्पेसिफिकेशन्स सह येतो आणि इंडोनेशिया मध्ये सेलसाठी उपलब्ध होणार आहे.

Xiaomi Redmi 8A Pro

स्पेसिफिकेशन्स पाहता Xiaomi Redmi 8A Pro मध्ये 1520 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.22 इंचाचा एचडी+ आईपीएस डॉटनॉच डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. कंपनीने रेडमी 8ए डुअल पी21आई नॅनो कोटिंगने कवर केला आहे जी फोनला हलक्या फुलक्या पाण्याच्या शिंतोड्यांपासून वाचवते. रेडमी 8ए डुअल कंपनीने ब्लू, वाईट आणि ग्रे कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे तसेच फोनच्या डिजाईनला Xiaomi ने ऑरा ग्रिल एक्स डिजाईनचे नाव दिले आहे.

Xiaomi Redmi 8A Pro एंडरॉयड आधारित मीयूआई वर सादर केला गेला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर चालतो. शाओमी रेडमी 8ए डुअल दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा पहिला वेरिएंट 2 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Xiaomi Redmi 8A Pro डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. विशेष म्हणजे रेडमी 8ए डुअल च्या फ्रंट आणि रियर दोन्ही कॅमेरा सेंसर्स मध्ये एआई टेक्नॉलॉजी आहे.

Xiaomi Redmi 8A Pro हा एक डुअल सिम फोन आहे ज्यात दोन सिम कार्ड सह एक मेमरी कार्ड पण वापरता येते. हा स्मार्टफोन 4जी वोएलटीई सोबत वोवाई-फाई फीचरला पण सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. Xiaomi Redmi 8A Pro मध्ये पावर बॅकअपसाठी 18वॉट सपोर्ट असेलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. पण बॉक्स मध्ये 10वॉटचा चार्जर मिळेल. शाओमी रेडमी 8ए डुअल टाईप-सी पोर्टच्या माध्यमातून चार्ज केला जाऊ शकतो तसेच हा फोन रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजी सह पण येतो.

किंमत

Xiaomi Redmi 8A Pro चा 2 जीबी रॅम + 16 जीबी स्टोरेज वेरिएंट इंडोनेशिया मध्ये IDR 1,549,000 मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत इंडियन करंसीनुसार 6,999 रुपयांच्या आसपास आहे. या फोनचा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट IDR 1,649,000 मध्ये बाजारात आला आहे जे भारतीय करंसीनुसार 7,500 रुपयांच्या आसपास होतात.