Home टॉप कलेक्शन 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे 10 स्मार्टफोन, जे गेल्या 30 दिवसांत झाले आहेत भारतात लॉन्च

10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे 10 स्मार्टफोन, जे गेल्या 30 दिवसांत झाले आहेत भारतात लॉन्च

मोठा डिस्प्ले, पावरफुल प्रोसेसर, जास्त कॅमेरा सेंसर्स आणि दमदार बॅटरी. हे सर्व फीचर्स जर एकाच स्मार्टफोन मध्ये हवे असतील तर 20,000 रुपये खर्च करावे लागत होते. पण आता भारतातील सर्व टेक ब्रँड्स स्मार्टफोन यूजर्सना आकर्षित करण्यासाठी स्वस्तात हे सर्व फीचर्स असलेले मोबाईल बाजारात आणत आहेत. Xiaomi, Samsung व Vivo समवेत इतर दिग्गज ब्रँड्सनी पण भारतात कमी किंमतीत शानदार स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. जर तुम्ही पण स्वस्त बजेट मध्ये दमदार स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर पुढे आम्ही 10 अश्या स्मार्टफोन्सची लिस्ट बनवली आहे जे गेल्या 30 दिवसांत भारतीय बाजारात लॉन्च झाले आहेत.

1. Xiaomi Redmi 8A

शाओमी ने आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत Redmi 8A स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे ज्यात 2 जीबी रॅम आणि 3 जीबी रॅम आहे. हे दोन्ही वेरिएंट 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात. Xiaomi Redmi 8A चा 2 जीबी रॅम वेरिएंट 6,499 रुपये आणि 3 जीबी रॅम वेरिएंट 6,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो 29 सप्टेंबर पासून फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

स्पेसिफिकेशन्स पाहता Redmi 8A 19:9 आस्पेक्ट रेशियो सह 720 × 1520 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.22-इंचाच्या एचडी+ टीएफटी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्टेड आहे. एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई सह हा फोन ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर चालतो. Xiaomi Redmi 8A मध्ये 12 मेगापिक्सलचा Sony IMX363 रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन डुअल सिम व 4जी एलटीई सह 18 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

2. Vivo U10

Vivo ने कालच भारतात आपल्या नवीन ‘यू सीरीज’ ची सुरवात करत Vivo U10 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे ज्यात बेस मॉडल 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो आणि या वेरिएंटची किंमत 8,990 रुपये आहे. तसेच Vivo U10 चे इतर दोन वेरिएंट 3 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज सह लॉन्च झाले आहेत. या वेरिएंट्सची किंमत क्रमश: 9,990 रुपये आणि 10,990 रुपये आहे. Vivo U10 29 सप्टेंबर पासून अमेझॉन वर विकत घेता येईल.

Vivo U10 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.35 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे. एंडरॉयड 9 पाई सह हा डिवाईस क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर वर चालतो. फोटोग्राफी साठी Vivo U10 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सल + 8 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचे तीन सेंसर्स आहेत. तसेच सेल्फी साठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

3. Samsung Galaxy M10s

Samsung ने 18 सप्टेंबरला हा स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला आहे. Samsung Galaxy M10s कंपनीने 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज सह लॉन्च केला आहे जो येत्या 29 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर 8,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. हा फोन Opal Black, Sapphire Blue आणि Pearl White मध्ये विकत घेता येईल.

Samsung Galaxy M10s 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.4-इंचाच्या V-इनफिनिटी एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई सह एक्सनॉस 7884B चिपसेट वर चालतो. Galaxy M10s मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो 13 मेगापिक्सल आणि 5 मेगपिक्सलच्या दोन सेंसर्सला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी साठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी Samsung Galaxy M10s 15वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,000 एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

4. Moto E6S

Motorola ने गेल्या 16 सप्टेंबरला भारतीय बाजारात आपला पहिला एंडरॉयड स्मार्ट टीवी लॉन्च केला होता. Motorola TV सोबत कंपनीने Moto E6s स्मार्टफोन पण बाजारात आणला होता. हा स्मार्टफोन 7,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता जो 23 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध झाला आहे. हा फोन रिच क्रेनबेरी आणि पॉलिश्ड ग्रेफाइट कलर ऑप्शन मध्ये विकत घेता येईल.

Moto E6s 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह सादर केला गेला आहे जो 6.1 इंचाच्या मॅक्स विजन एचडी+ नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड पाई आधारित हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक पी22 चिपसेट वर चालतो. Moto E6s 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी साठी Moto E6s डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचे दोन सेंसर्स आहेत. तसेच सेल्फी साठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Moto E6s मध्ये पावर बॅकअप साठी 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

5. Lenovo A6 Note

Lenovo ने सप्टेंबरच्या 5 तारखेला भारतात एक साथ तीन स्मार्टफोन लॉन्च केले होते ज्यात Lenovo Z6 Pro, Lenovo K10 Note आणि Lenovo A6 Note स्मार्टफोनचा समावेश होता. Lenovo A6 Note तिन्ही फोन मध्ये सर्वात स्वस्त फोन आहे जो 7,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच 11 सप्टेंबर पासूनच देशात विक्री साठी उपलब्ध झाला आहे.

Lenovo A6 Note मध्ये 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह 6.09-इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. एंडरॉयड ओएस सोबत फोन मीडियाटेक हेलियो पी22 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी साठी Lenovo A6 Note मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे दोन सेंसर्स आहे. तसेच सेल्फी साठी हा लेनोवो फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Lenovo A6 Note मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

6. Infinix Hot 8

Infinix Hot 8 ने 4 सप्टेंबरला भारतीय बाजारात पाऊल टाकले होते. हा स्मार्टफोन 6,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता जो 12 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध झाला आहे. या किंमतीत Infinix Hot 8 स्मार्टफोन यूजर्सना 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देतो जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.

स्पेसिफिकेशन्स पाहता Infinix Hot 8 20:9 आस्पेक्ट रेशियो सह 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9 पाई आधारित हा फोन 2.0गीगाहर्ट्ज आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी साठी Infinix Hot 8 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचे तीन सेंसर्स आहेत. तसेच फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. Infinix Hot 8 मध्ये पावर बॅकअप साठी 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

7. Tecno Spark Go

टेक कंपनी टेक्नो ने गेल्या 29 ऑगस्टला भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले होते ज्यात Tecno Spark Go आणि Tecno Spark 4 Air चा समावेश होता. Tecno Spark Go यात सर्वात स्वस्त फोन होता जो 5,499 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. हा स्मार्टफोन 2 जीबी रॅम मेमरी सह 16 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

स्पेसिफिकेशन्स पाहता Tecno Spark Go 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह 6.1-इंचाच्या एचडी+ डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई सह 2.0 गीगाहर्ट्ज क्वॉड कोर प्रोसेसर आणि मीडियाटेक हेलीयो ए22 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी साठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा एआई रियर कॅमेरा तसेच 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 3000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

8. Tecno Spark 4 Air

टेक्नो द्वारा लॉन्च केला गेलेला हा दुसरा डिवाईस पण एंट्री सेग्मेंट मध्ये आला आहे. हा स्मार्टफोन 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते. Tecno Spark 4 Air भारतीय बाजारात 6,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

स्पेसिफिकेशन्स पाहता Tecno Spark 4 Air पण 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह 6.1-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड पाई सह हा फोन 2.0 गीगाहर्ट्ज क्वॉड कोर प्रोसेसर व मीडियाटेक हेलीयो ए22 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी साठी हा टेक्नो फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सलचा प्राइमरी आणि सेकेंडरी वीजीए कॅमेरा आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Tecno Spark 4 Air 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

9. Samsung Galaxy A10s

सॅमसंगचा हा फोन 27 ऑगस्टला भारतीय बाजारात आला होता जो दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता. Samsung Galaxy A10s चा 2 जीबी रॅम + 32 जीबी मेमरी वेरिएंट 9,499 रुपये तर 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 10,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन फोन ब्लू, ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy A10s मध्ये 6.2-इंचाचा एचडी+ टीएफटी इफिनिटी-वी डिस्प्ले देण्यात आला आहे. एंडरॉयड 9 पाई सह 2.0 गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर व एक्सनॉस चिपसेट वर हा फोन चालतो. फोटोग्राफी साठी Galaxy A10s मध्ये 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Samsung Galaxy A10s मध्ये 4000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

10. Samsung Galaxy A20s

Samsung ने या आठवड्यात Galaxy A20s ग्लोबल मंचावर ऑफिशियल केला आहे. हा फोन लवकरच भारतात येणार आहे पण 91मोबाईल्सला फोन लॉन्चच्या आधीच Galaxy A20s ची इंडियन किंमत मिळाली आहे. Samsung Galaxy A20s दोन वेरिएंट मध्ये भारतात लॉन्च केला जाईल, ज्यात 3 जीबी रॅम सह 32 जीबी मेमरी तसेच 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज असेल. Samsung आपल्या नवीन स्मार्टफोन Galaxy A20s चा 3 जीबी रॅम वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये लॉन्च करेल. तर फोनचा 4 जीबी रॅम वेरिएंट 12,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल.

Samsung Galaxy A20s 2.4डी ग्लास ने प्रोटेक्टेड 6.5 इंचाच्या एचडी+ Infinity V डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9 पाई सह हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी साठी Samsung Galaxy A20s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सल + 8 मेगापिक्सल + 5 मेगापिक्सलचे सेंसर्स आहेत. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy A20s मध्ये पावर बॅकअप साठी 4000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.