Xiaomi ने आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Redmi 9 Power लाॅन्च केला आहे. हा फोन ‘रेडमी 9’ सीरीज मधेच जोडला आहे जो शानदार लुक सोबतच दमदार स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो. रेडमी 9 पावर सोबतच शाओमीने भारतीय बाजारात आपला अजून एक मोबाईल जोडला आहे जो 6,000एमएएचच्या मोठ्या बॅटरी सह येतो. Redmi 9 Power ची बेस किंमत 10,999 रुपये आहे जो येत्या 22 डिसेंबर पासून शाॅपिंग साइट अमेझॉन वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Xiaomi Redmi 9 Power
शाओमी रेडमी 9 पावर कंपनीने वाॅटरड्राॅप नाॅच डिस्प्ले डिजाईन वर लाॅन्च केला आहे. हा फोन 6.53 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ डाॅट ड्राॅप डिस्प्लेला सपोर्ट करतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. रेडमी 9 पावरचा डिस्प्ले 1500ः1 काॅट्रास्ट रेशियो तसेच 400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. तसेच फोनचा वापर करताना डोळ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी हा TÜV Rheinland लो ब्लू लाईट टेक्नॉलॉजी सह येतो.
Xiaomi Redmi 9 Power अँड्रॉइड 10 आधारित फोन आहे जो मीयुआय 12 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीड असलेल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वाॅलकाॅमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी रेडमी 9 पावर स्मार्टफोन एड्रेनो 610 जीपीयूला सपोर्ट करतो. शाओमीने आपला फोन LPDDR4X रॅम आणि UFS 2.2 स्टोरेज सह येतो.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता रेडमी 9 पावर क्वाॅड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच रियर कॅमेरा सेटअप मध्ये 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Redmi 9 Power एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी जिथे फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड बटन देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलाॅक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रेडमी 9 पावर स्मार्टफोन 18वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.
वेरिएंट्स व किंमत
Xiaomi ने Redmi 9 Power दोन वेरिएंट्स मध्ये लाॅन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच याची किंमत फक्त 10,999 रुपये आहे. फोनचा दुसरा वेरिएंट 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वर लाॅन्च केला गेला आहे ज्याची किंमत 11,999 रुपये आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येईल. रेडमी 9 पावर 22 डिसेंबर पासून अमेझॉन वर Mighty Black, Blazing Blue, Fiery Red आणि Electric Green कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.
