शाओमी सध्या स्मार्टफोन बाजारावर राज्य करत आहे आणि कंपनीला इथवर आणण्यात रेडमी नोट सीरीज चे मोठे योगदान आहे. या वर्षी शाओमी ने रेडमी नोट 5 आणि रेडमी नोट 5 प्रो सादर केले होते पण आता कंपनी रेडमी नोट 6 ची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी हे फोन्स काही सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट करण्यात आले आहेत. 91मोबाईल्सला ने हे फोन्स यूएस च्या सर्टिफिकेशन साइट फेडरल कम्यूनिकेशन कमिशन (एफसीसी) वर स्पॉट केले आहेत.
शाओमी ने हे फोन्स एफसीसी वर मॉडेल नंबर एफ1806ई7टीजी सह लिस्ट केले आहेत. तिथे फोन बद्दल कोणतेही स्पेसिफिकेशन नाहीत पण यावरुन कंपनीची तयारी दिसून येते. तिथे फोन च्या नावाचा खुलासा करण्यात आला नाही पण आता पर्यंत जी माहिती समोर आली आहे त्यानुसार हे शाओमी रेडमी नोट 6 आणि रेडमी नोट 6 प्रो वाटतात.
सर्टिफिकेशन साइट वरून डुअल बँड वाय—फाय आणि नेटवर्क ची माहिती मिळते. फोन मधील एलटीई, डब्लूसीडीएमए, सीडीएमए आणि जीएसएम सहित अन्य सपोर्ट बद्दल माहिती देण्यात आली आहे. जरी कंपनी ने मीयूआई 10 ची घोषणा केली असली तरी आता पर्यंत तो कोणत्याही फोन मध्ये उपलब्ध झाला नाही. त्यामुळे हा फोन पण मीयूआई 9 सोबत सर्टिफाइड करण्यात आला आहे.
फोन बद्दल अजूनतरी जास्त लीक आलेले नाहीत पण एवढे मात्र नक्की की शाओमी रेडमी नोट 6 आणि रेडमी 6 प्रो ची तयारी करत आहे.
आत्ताच शाओमी ने भारतीय बाजारात नवीन ब्रांड सादर केला आहे. कंपनी ने पोको एफ1 आणला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो आणि यात तीन मेमरी वेरियंट आहेत. भारतात याची बेसिक किंमत 20,999 रुपये आहे.
