शाओमी ने नुकतीच इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये आपला धाक कायम ठेवत रेडमी 6 सीरीज सादर केली आहे. कंपनी ने एक साथ तीन स्मार्टफोन लॉन्च केले होते, ज्यात रेडमी 6, रेडमी 6ए आणि रेडमी 6 प्रो यांचा समावेश होता. आज शाओमी ने अंर्तराष्ट्रीय मंचावर आपला नवीन डिवाईस रेडमी नोट 6 प्रो पण लॉन्च केला आहे. रेडमी नोट 6 प्रो कंपनी ने 4 कॅमेरा सेंसर सह बाजारात आणला आहे. शाओमी ने रेडमी नोट 6 प्रो सध्या थायलंड मध्ये लॉन्च केला आहे तिथे या फोनची किंमत 6,990 थाई भाट म्हणजे भारतीय करंसी नुसार जवळपास 15,599 रुपये ठेवण्यात आली आहे.
शाओमी रेडमी नोट 6 प्रो ची सर्वात मोठी खासियत फोनचा कॅमेरा सेग्मेंट आहे. रेडमी नोट 6 प्रो च्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनेल्स वर डुअल कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.9 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कामेरर देण्यात आला आहे तर सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 20-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा डुअल पिक्सल कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
रेडमी नोट 6 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो सह सादर करण्यात आला आहे ज्यात नॉच आहे. फोन मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन मीयूआई 9.6 आधारित एंडरॉयड ओरियो सह सादर करण्यात आला आहे तसेच 14एनएम कोरयो 260 सीपीयू सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो.
कंपनी नवे रेडमी नोट 6 प्रो 6जीबी रॅम सह सादर केला आहे सोबत ग्राफिक्स साठी यात एड्रेनो 509 जीपीयू आहे. हा फोन 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. रेडमी नोट 6 प्रो मध्ये एआई टेक्नॉलॉजी आहे. पावर बॅकअप साठी रेडमी नोट 6 प्रो मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात अली आहे.
शाओमी रेडमी नोट 6 प्रो थायलंड मध्ये ब्लॅक, ब्लू आणि रोज गोल्ड कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. शाओमी ने अजूनतरी फोनच्या ग्लोबल लॉन्च ची घोषणा केलेली नाही. त्यामुळे शाओमी आपला हा फोन भारतात कधी घेऊन येईल हॆ सांगता येत नाही.
