शाओमी ने नुकतीच भारतीय बाजारात आपली रेडमी सीरीज वाढवत एक साथ तीन नवीन स्मार्टफोन रेडमी 6, रेडमी 6ए आणि रेडमी 6 प्रो लॉन्च केले आहेत. तसेच आता शाओमी अंर्तराष्ट्रीय मंचावर पण लवकरच आपल्या रेडमी नोट सीरीजचा विस्तार करणार आहे. शाओमी रेडमी नोट 6 बद्दल आधी पण लीक्स समोर आले आहेत आता शाओमी रेडमी नोट 6 प्रो स्मार्टफोनचा खरा फोटो पण इंटरनेट वर लीक झाला आहे. रेडमी नोट 6 प्रो चे फोटो समोर आल्यामुळे फक्त फोन लवकरच लॉन्च होणार असल्याचे समोर येत नाही तर याच्या डिजाईन आणि स्पेसिफिशन्सची माहिती पण मिळाली आहे. की
शाओमी रेडमी नोट 6 प्रो ची लाईव इमेज विदेशी वेबसाइट रेड्डीट ने शेयर केली आहे. वेबसाइट वर फोनचा फ्रंट पॅनल दाखवण्यात आला आहे सोबतच फोन बॉक्स च्या मागील भागाचा फोटो शेयर करण्यात आला आहे. फोटो मध्ये फोन अगदी नवीन दिसत आहे ज्याच्या फ्रंट पॅनल वरून प्लास्टिक स्क्रीन पण काढण्यात आली नाही. डिस्प्ले वरील या प्लास्टिक वर शाओमी च्या लोगो सोबत ‘रेडमी नोट 6 प्रो’ लिहिण्यात आले आहे.
लीक वरून समजले आहे की रेडमी नोट 6 प्रो 19:9 आस्पेक्ट रेशियो सह सादर केला जाईल, म्हणजे फोन मध्ये नॉच असेल. तसेच फोन मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. फोटो वरून हे स्पष्ट झाले आहे की रेडमी नोट 6 प्रो मध्ये शाओमी 4 कॅमेरा सेंसर देईल. समोर आलेल्या रेडमी नोट 6 प्रो चा बॉक्स 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज वेरिएंट चा आहेत तसेच फोटो मधील फोन ब्लॅक कलर वेरिएंट आहे.
रेडमी नोट 6 प्रो च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात येईल तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी पण रेडमी नोट 6 प्रो च्या फ्रंट पॅनल वर 2 कॅमेरा सेंसर मिळतील. फोनच्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचा डुअल पिक्सल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो तसेच लीक नुसार फोनच्या फ्रंट पॅनल वर 20-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन सेल्फी कॅमेरा देण्यात येतील.
समोर आलेल्या फोटो वरून समजले आहे की रेडमी नोट 6 प्रो मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात येईल. तसेच फोटो मधील फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे. बोलले जात आहे की शाओमी रेडमी नोट 6 प्रो 4जीबी रॅम सोबत 6जीबी रॅम आणि 3जीबी/32जीबी च्या वेरिएंट मध्ये पण सादर केला जाऊ शकतो. आशा आहे की शाओमी आता लवकरच हा फोन जगासमोर ठेऊन रेडमी नोट 6 प्रो आॅफिशियली लॉन्च करेल.
