91मोबाईल्स ने गेल्या आठवड्यात बातमी देऊन सांगितले होते की शाओमी कंपनी आपली नोट सीरीज वाढवण्याची योजना करत आहे आणि रेडमी नोट 6 वर काम पण सुरु झाले आहे. बातमी अशी होती की शाओमी रेडमी नोट 6 आणि रेडमी नोट 6 प्रो येत्या काही आठवड्यात टेक जगासमोर सादर केले जातील. त्यानुसार आज एका लीक मधून रेडमी 6 प्रो चे स्पेसिफिकेशन्स आणि याची किंमत शेयर करण्यात आली आहे.
शाओमी रेडमी नोट 6 प्रो बद्दल विख्यात टिप्सटर रोनाल्ड क्वॉड्ट ने ट्वीट केले आहे ज्यात फोनची किंमत आणि याचे कलर वेरिएंट याचा खुलासा करण्यात आला आहे. या ट्वीट नुसार रेडमी नोट 6 प्रो शाओमी 2 रॅम वेरिएंट मध्ये सादर केला जाईल. एक वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम सोबत 32जीबी इंटरनल स्टोरेज असेल तर दुसरा वेरिएंट 4जीबी रॅम सोबत 64जीबी च्या मेमरीला सपोर्ट करेल.
रेडमी नोट 6 प्रो बद्दल सांगण्यात आले आहे की हा फोन गोल्ड, ब्लू आणि ब्लॅक कलर वेरिएंट्स मध्ये येईल. रोनाल्ड यांच्या माहिती नुसार रेडमी नोट 6 प्रो चा 3जीबी रॅम वेरिएंट 200 यूरो तर 4जीबी रॅम वेरिएंट 250 यूरो मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. भारतीय करंसी नुसार ही किंमत क्रमश: 16,500 रुपये aani 20,000 रुपयांच्या आसपास असेल.
शाओमी रेडमी नोट 6 काही दिवसांपूर्वी यूएस च्या सर्टिफिकेशन साइट फेडरल कम्यूनिकेशन कमिशन (एफसीसी) वर दिसला होता. या वेबसाइट वर फोन एफ1806ई7टीजी मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे. सर्टिफिकेशन साइट वर फोन मधील डुअल बँड वाई-फाई, एलटीई, डब्लूसीडीएमए, सीडीएमए आणि जीएसएम सह इतर सपोर्ट बद्दल माहिती मिळाली होती.
रेडमी नोट 6 किंवा रेडमी नोट 6 प्रो बद्दल अजूनतरी शाओमी ने कोणतीही आॅफिशियल माहिती दिली नाही. त्यामुळे कंपनी द्वारा आॅफिशियल घोषणा होईस्तोवर फोनच्या किंमत व रॅम-स्टोरेज च्या माहिती वर विश्वास ठेवता येणार नाही.
