Xiaomi ने जुलै मध्ये भारतीय बाजारात आपल्या ‘रेडमी नोट’ सीरीज अंतगर्त Redmi Note 9 स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन 11,999 रुपयांच्या बेस किंमतीत मार्केट मध्ये सादर केला गेला होता जो इंडियन फॅन्सना खूप आवडला आहे. अश्याच फॅन्ससाठी शाओमी एक खास ऑफर घेऊन आली आहे ज्या अंतर्गत दोन दिवस रेडमी नोट 9 स्मार्टफोन 2,500 रुपयांच्या डिस्काउंट सह विकत घेता येईल. हि स्पेशल ऑफर आज म्हणजे 22 डिसेंबर पासूनच सुरु झाली आहे.
Redmi Note 9 स्मार्टफोन Xiaomi द्वारे स्पेशल ऑफर अंतगर्त विक्रीसाठी उपलब्ध केला जात आहे. हा सेल फक्त दोन दिवसांचा आहे जो आज म्हणजे 22 डिसेंबरला सुरु होऊन उद्या रात्री म्हणजे 23 डिसेंबर पर्यंत सुरु राहील. या दोन दिवसांत रेडमी नोट 9 स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह विक्रीसाठी उपलब्ध होईल. अर्थात् 11,999 रुपयांचा हा फोन 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. फक्त इतकेच नव्हे तर अमेझॉन वर एचडीएफसी कार्ड वापरल्यावर 1,500 चा एक्स्ट्रा डिस्काउंट पण मिळेल , म्हणजे 2,500 रुपयांची सूट.
Redmi Note 9
हि खास ऑफर फोनच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट वर लागू असेल. रेडमी नोट 9 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या फुलएचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी हा कोर्निंग गोरिल्ला 5 ने प्रोटेक्ट केला गेला आहे. यूजर्सला चांगला अनुभव मिळावा म्हणून शाओमीने फोन डिस्प्ले मध्ये रिडिंग मोड 2.0 आणि सनलाईट मोड दिला आहे.
Xiaomi ने हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो मीयूआई 11 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी Redmi Note 9 मध्ये आक्टा-कोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हीलियो जी85 चिपसेट देण्यात आला आहे. टेक मार्केंट मध्ये Redmi Note 9 पहिला फोन होता जो या चिपसेट सह लॉन्च झाला होता.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Redmi Note 9 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आला आहे. तसेच हा फोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Xiaomi Redmi Note 9 रियल डुअल सिम फोन आहे जो 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रेडमी नोट 9 स्मार्टफोन मध्ये 22.5वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5020एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 9वॉट रिवर्स चार्जिंगला पण सपोर्ट करतो.
शाओमी रेडमी नोट 9 व्हिडीओ
