शाओमीचे प्रेसिडेंट लीन बिन ने काही वेळापूर्वी सांगितले होते की कंपनी एका अशा स्मार्टफोन वर काम करत आहे ज्यात 48-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात येईल. कंपनीने या फोनची माहिती सांगितली नव्हती पण हा फोन शाओमी मी 9 नावाने लॉन्च होईल अशी चर्चा होती. पण आता नवीन रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की शाओमीचा 48-एमपी कॅमेऱ्यासह येणार फोन मी 9 नसून रेडमी प्रो 2 असेल. रेडमी प्रो 2 ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वर पण आला आहे.
चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर एक टीजर शेयर केला गेला आहे ज्यात रेडमी प्रो 2 स्मार्टफोन दाखवण्यात आला आहे. या ईमेज टीजर मध्ये फोनचा फोटो नाही पण रेडमी प्रो 2 चे नाव लिहिण्यात आले आहे. या टीजर मध्ये रेडमी प्रो 2 सोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 लिहिण्यात आले आहे. वेईबो वर हि ईमेज स्लॅशलीक द्वारा शेयर करण्यात आली आहे आणि हा टीजर समोर आल्यामुळे बोलले जात आहे की रेडमी प्रो 2 शाओमी स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट सह लॉन्च करेल.
शाओमी रेडमी प्रो 2 साल 2016 मध्ये लॉन्च झालेल्या रेडमी प्रो चा अपडेटेड वर्जन असेल. तसेच चिपसेटच्या महितीसोबत नवीन लीक मध्ये असे पण सांगण्यात आले आहे की रेडमी प्रो 2 शाओमी 48-मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसर सह लॉन्च करेल. बोलले जात आहे की या कॅमेरा सेंसर सोबत रेडमी प्रो 2 मध्ये डुअल एलईडी फ्लॅश पण दिला जाईल. रिपोर्ट्स नुसार रेडमी प्रो 2 च्या फ्रंट पॅनल वर ‘पंच होल’ डिस्प्ले असेल आणि या छोटयाश्या छिद्रात सेल्फी कॅमेरा दिला जाईल.
रेडमी प्रो 2 बद्दल बोलले जात आहे की शाओमी हा फोन 20,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीती लॉन्च करेल. विशेष म्हणजे की रेडमी सीरीज मध्ये शाओमी ने अजूनपर्यंत हि प्राइस रेंज गाठली नाही. शाओमीचे सर्व रेडमी फोन मीड बजेट मधेच लॉन्च झाले आहेत. पण रेडमी प्रो 2 बद्दल जोपर्यंत शाओमी कोणतीही ऑफिशियल माहिती देत नाही तोपर्यंत फोनच्या या बातम्या फक्त लिक्स आहेत.
शाओमी येत्या 24 डिसेंबरला चीन मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट मधून आपल्या ‘मी सीरीज’ मध्ये नवीन स्मार्टफोन शाओमी मी प्ले नावाने लॉन्च करेल. हा फोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह येईल तसेच याचे जास्तीत जास्त स्पेसिफिकेशन्स व फीचर् पोको एफ1 सारखे असतील.
