गेल्या महिन्यात शाओमी च्या को-फाउंडर लिन बिन यांनी एक पोस्ट चीनी सोशल मीडिया वर शेयर केली होती ज्यात माहिती देण्यात आली होती कि कंपनी लवकरच 48एमपी कॅमेरा असलेला फोन लॉन्च करणार आहे. पण त्यांनतर याबद्दल जास्त लीक आले नाहीत. परंतु आज कंपनी ने अधिकृतपणे या फोनच्या लॉन्चचा खुलासा केला आहे. कंपनी ने माहिती दिली आहे कि 10 जानेवारीला हा फोन लॉन्च केलं जाईल. यासाठी कंपनी ने एक पोस्ट शेयर केली आहे ज्यात स्पष्टपणे 4800 दिसत आहे. त्यामुळे आशा केली जाऊ शकते कि शाओमी 48-एमपी कॅमेरा असलेला फोन लॉन्च करेल.
या पोस्टर सोबत कंपनी ने एक मेसेजपण शेयर केला आहे जो यूजर्सना अजूनच धक्का देऊ शकतो. कंपनी ने मेसेज शेयर केला आहे कि आता रेडमी एक वेगळा ब्रँड असेल. अर्थात कंपनी शाओमी पासून रेडमी ब्रँड वेगळा आहे. पण कंपनी ने अजून आपली रणनीती सांगितली नाही कि शाओमी आणि रेडमी ब्रँड मध्ये कशाप्रकरचे फोन्स असतील. परंतु अशा आहे की शाओमी मध्ये रेडमी ब्रँड मध्ये एंट्री लेवल फोन असतील तर वरच्या रेंजचे फोन कंपनी शाओमी ब्रँड मध्ये लॉन्च करेल.
48एमपी कॅमेरा असलेल्या फोन बद्दल बोलायचे तर आतापर्यंत जी माहिती आली आहे त्यानुसार या फोनचे नाव रेडमी प्रो 2 असेल. फोनच्या स्पेसिफिकेशनची माहिती सध्या नाही पण लीक ज्यात छोटी मोठी माहिती मिळाली आहे. नुकत्याच आलेल्या एका लीक नुसार रेडमी 2 प्रो क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट सह दार केला जाऊ शकतो.
तसेच लीक मध्ये असा पण खुलासा केला गेला आहे कि हा फोन कंपनी पंच होल डिस्प्ले सह सादर करू शकते. तसेच फोन मध्ये तुम्हाला डुअल एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेरा मिळेल.
रेडमी प्रो 2 बद्दल बोलले जात आहे कि शाओमी हा फोन 20,000 रुपयांच्या किंमतीसह लॉन्च करेल. विशेष म्हणजे रेडमी सीरीज मध्ये शाओमी ने अजूनतरी हि प्राइस रेंज गाठली नाही. शाओमीचे सर्व रेडमी फोन मीड बजेट मधेच लॉन्च झाले आहेत. पण रेडमी प्रो 2 बद्दल जोपर्यंत शाओमी अधिकृत माहिती देत नाही तोपर्यंत येणाऱ्या बातम्या म्हणजे लीक आहेत.
