भारत सध्या जगातील सर्वात मोठ्या मोबाईल बाजारांपैकी एक आहे. जगातील मोबाईल ब्रँड्स आणि टेक कंपन्यांची नजर भारतावर आहे आणि प्रत्येकाला इथे गुंतवणूक करायची आहे. गेले काही महीने इंडियन मार्केटसाठी खूप चढ उताराने भरलेले होते. एकीकडे कोरोना वायरसने संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर घाव घातला आहे तर दुसरीकडे देशात निर्माण झालेल्या अँटी चायना वातावरणाने चीनी कंपन्यांचे प्रोडक्ट्स नाकारले आहेत. याचा परिणाम असा समोर आला आहे कि देशात स्मार्टफोन्स बाजारात 50 टक्क्यांपेक्षा पण जास्त घसरण झाली आहे.
भारतीय मोबाईल बाजाराचा हा लेखाजोखा रिसर्च फार्म आईडीसी ने शेयर केला आहे. आईडीसी ने दुसऱ्या तिमाहीचा रिपोर्ट सादर केला आहे ज्यात एप्रिल, मे आणि जून महिन्यात झालेल्या मोबाईल्सची विक्री आणि शिमपेंट इत्यादींची माहिती आहे. रिपोर्ट मध्ये वर्ष 2020 आणि वर्ष 2019 च्या दुसऱ्या क्वॉटरची तुलना पण करण्यात आली आहे ज्यामुळे खुलासा झाला आहे कि गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी स्मार्टफोन शिपमेंट मध्ये 50.6 टक्क्यांची घसरण झाली आहे. यावर्षी या तीन महिन्यांत 182 लाख मोबाईल यूनिट्स भारतात शिप झाले आहेत.
हे आहेत टॉप 5 ब्रँड
आधीप्रमाणे यावेळी पण Xiaomi भारतातील टॉप 5 स्मार्टफोन ब्रँड्स मध्ये नंबर वन वर आहे. दुसऱ्या तिमाहीत शाओमी कडे 29.4% मार्केट शेयर होता. शाओमीला सतत टक्कर देत असलेल्या Samsung ला या लिस्ट मध्ये दुसरे स्थान मिळाले आहे. सेकंड क्वॉटर मध्ये सॅमसंग कडे 26.3% मार्केट शेयर आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत शाओमीने 28.4% आणि सॅमसंगने 25.2% मार्केट शेयर्स आपल्या नावे केला होता.
IDC Report
या यादीत तिसरे नाव Vivo चे आहे. वीवो कंपनी कडे गेल्या वर्षीच्या दुसऱ्या क्वॉटर मध्ये 15.1% मार्केट शेयर होता तर यावर्षी हा वाढून 17.5% झाला आहे. तसेच 9.8% मार्केट शेयरसह Realme या यादीत चौथ्या स्थानी आहे. विशेष म्हणजे रियलमी असा ब्रँड आहे ज्याच्या शिपमेंट मध्ये सर्वात कमी घट झाली आहे. यादीत पाचव्या क्रमांकावर नाव OPPO चे आहे.
कोणी विकले किती फोन
मार्केट शेयर नंतर यूनिट शिपमेंट बद्दल बोलायचे तर देशात एकूण 182 लाख मोबाईल यूनिट्स शिप झाले आहेत. यातील Xiaomi ने 54 लाख यूनिट्स शिप केले आहेत, तर Samsung ने शिप केलेल्या यूनिट्सची संख्या 48 लाख आहे. तसेच Vivo ने 32 लाख फोन शिप केले आहेत तर Realme आणि OPPO ने 1.8 लाख यूनिट्स शिप केले आहेत.
