स्मार्टफोन इंडस्ट्री मध्ये सध्या नॉच, पंच-होल आणि पॉप-अप कॅमेरा असलेल्या मोबाईल्सचा ट्रेंड आहे. कंपन्या यांच्या मदतीने आपल्या फोन्स मध्ये फुल-स्क्रीन डिस्प्ले देत आहेत. पण आता यूजर्सना लवकरच फोन मध्ये अशी टेक्नॉलजी मिळणार आहे, जिच्या मदतीने सेल्फी कॅमेरा डिस्प्लेच्या खाली ठेवता येईल. अनेक कंपन्यांनी अशी टेक्नॉलजी तयार करण्याचा दावा पण केला आहेत. पण आतापर्यंत कोणत्याही फोन मध्ये अंडर-डिस्प्ले कॅमेरा दिसला नाही. अलीकडेच ZTE ने कन्फर्म केले होते कि ते Axon 20 5G स्मार्टफोन 1 सप्टेंबरला लॉन्च करतील. कंपनीचा दावा आहे कि हा अंडर-डिस्प्ले कॅमेरा सेंसर असलेला जगातील पहिला स्मार्टफोन असेल. आता शाओमीने एक विडियो शेयर केला आहे, ज्यात डिस्प्लेच्या खाली कॅमेरा असलेल्या टेक्नॉलजीची झलक दिसली आहे.
ट्विट मध्ये झाला खुलासा
शाओमीचे प्रेसिडेंट Shou Zi Chew ने आपल्या ट्विटर हँडल वर एक वीडियो पोस्ट केला आहे. या वीडियो मध्ये अंडर-डिस्प्ले टेक्नोलॉजी असलेला एक फोन दिसला आहे. ट्विट मध्ये Shou यांनी लिहिले आहे “”आम्हाला आमच्या Xiaomi इंजिनिअर्सने बनवलेला नवीन मास्टपीस सादर करताना गर्व वाटत आहे: तिसऱ्या पिढीची अंडर-डिस्प्ले कॅमेरा टेक्नॉलॉजी! फुल-स्क्रीन डिस्प्ले असलेल्या फोन्सचे उत्पादन पुढल्यावर्षी मोठ्या प्रमाणात सुरु होऊ शकते.’’
We’re proud to present the latest masterpiece from our Xiaomi engineers: 3rd Generation Under-Display Camera Technology! True full-screen displays are just around the corner! We're planning on putting this into mass production next year. Stay tuned! #InnovationForEveryone pic.twitter.com/DrKeL8wZUg
— Shou Zi Chew (@ShouZiChew) August 28, 2020
अशी असेल टेक्नोलॉजी
एका पोस्ट मध्ये Xiaomi ने सांगितले आहे कि कशाप्रकारे त्यांची थर्ड जनरेशन अंडर डिस्प्ले कॅमेरा टेक्नॉलजी काम करते. शाओमी नुसार आधी या टेक्नॉलजीसाठी चार पैकी एक पिक्सल डिस्प्लेसाठी रिजर्व केला गेला होता, ज्याचा परिणाम डिस्प्लेच्या पिक्सल डेंसिटी वर होत होता. चार पैकी तीन भाग पारदर्शक ठेऊन कंपनी जास्त लाइट सेल्फी कॅमेऱ्यापर्यंत पोचवत होती. आता कंपनी प्रत्येक पिक्सलचा थोडा भाग डिस्प्लेसाठी रिजर्व करत आहे आणि बाकी भाग पारदर्शक आहे, ज्यामुळे चांगल्या पिक्सल डेंसिटी सह कॅमेरा पण योग्यरितीने वापरता येतो.
पुढच्यावर्षी लॉन्च होऊ शकतो फोन
शाओमी 2021 च्या सुरवातीला हि टेक्नॉलॉजी असलेले फोन लॉन्च करू शकते. वीडियो मधील नवीन प्रोटोटाइप बद्दल बोलायचे तर हा मॉडीफाइड Mi 10 Ultra सारखा दिसत आहे, ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी कोणताही पंच-होल नाही आणि कॅमेरा डिस्प्लेच्या खाली आहे.
साल 2019 मध्ये बनली होती शाओमीची पहिली अंडर-स्क्रीन कॅमेरा टेक्नॉलॉजी
विशेष म्हणजे शाओमीने गेल्यावर्षी जून, 2019 मध्ये फर्स्ट जेनरेशन अंडर स्क्रीन कॅमेरा टेक्नॉलजी बनवली होती. तसेच पहिल्या प्रोटोटाइपचा विडियो पण शेयर केला होता. पण नंतर समोर आले होते कि डिस्प्ले मधील कॅमेऱ्याच्या जागेवरील पिक्सल डेंसिटी खूप कमी आहे.
त्यांनतर शाओमी सीईओ लेई जुन यांनी ऑक्टोबर, 2019 मध्ये सेकंड जेनरेशन अंडर-डिस्प्ले कॅमेरा टेक्नॉलजीचा विडियो शेयर केला होता. आता शाओमीचे प्रेसिडेंट Shou Zi Chew यांनी थर्ड जेनरेशन आणि जास्त इंप्रूवमेंट सह अंडर-डिस्प्ले कॅमेरा टेक्नॉलॉजी सादर केली आहे.
