Home बातम्या Mi Super Sale: शाओमीच्या फोन वर मिळत आहे भरभक्कम सूट, जाणून घ्या कधी आणि कुठे

Mi Super Sale: शाओमीच्या फोन वर मिळत आहे भरभक्कम सूट, जाणून घ्या कधी आणि कुठे

फेस्टिव सीजन संपल्यानंतर पण शाओमी ने अजून एका सेलचे आयोजन केले आहे. या सेलचे नाव Mi Super Sale आहे, ज्यात Redmi Note 7 Pro, K20, K20 Pro अजून अनेक स्मार्टफोन स्वस्तात विकले जात आहेत. 5 नोव्हेंबरला सुरु होणारा हा सेल 10 नोव्हेंबर पर्यंत सुरु असले. याचा अर्थ 6 दिवस चालणाऱ्या या सेल मध्ये तुम्ही पण एक नवीन स्मार्टफोन स्वस्तात विकत घेऊ शकता.

Xiaomi ने या सेलचे आयोजन आपल्या वेबसाइट आणि ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट वर केले आहे. इतकेच नव्हे तर या सेल मध्ये वेगळे पैसे देऊन स्मार्टफोनच्या खरेदीवर मी प्रोटेक्ट आणि मी स्क्रीन प्रोटेक्टचा लाभ पण घेता येईल. तसेच जुना फोन एक्सचेंज करून अतिरिक्त डिस्काउंट घेता येईल.

Mi Super Sale 10 नोव्हेंबर पर्यंत चालेल. हा सेल शाओमीच्या वेबसाइट वर आयोजित होईल. पोको एफ1, रेडमी 7ए आणि रेडमी नोट 7 प्रो Flipkart वर पण डिस्काउंट सह मिळत आहेत. पण या प्लॅटफॉर्म वर रेडमी के20 आणि रेडमी के20 प्रो वर कोणतीही सूट नाही. हे फोन्स कंपनीच्या वेबसाइट वर डिस्काउंट सह सादर केले जात आहेत.

जर तुम्हाला K20 Pro विकत घ्यायचा असेल तर मी डॉट कॉम वर हा फोन 25,999 रुपयांच्या बेस किंमतीत सेल केला जात आहे. सेल नसताना या फोनची किंमत 27,999 रुपये असते. याचा अर्थ असा कि तुम्हाला 2,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. रेडमी के20 सेल मध्ये 19,999 रुपयांच्या बेस किंमतीत मिळेल.

Xiaomi पोको एफ1 को 14,999 रुपयांच्या बेस किंमतीत सेल केला जात आहे. जो हँडसेट 18,999 रुपयांच्या बेस किंमतीत उपलब्ध असतो. Mi Super Sale मध्ये रेडमी नोट 7 प्रो पण स्वस्तात विकत घेता येईल. याची बेस किंमत 11,999 रुपये करण्यात आली आहे. तसेच सेल मध्ये रेडमी 7ए 5,499 रुपयांच्या बेस किंमतीत विकला जात आहे. या फोनची लॉन्च प्राइस 5,999 रुपये आहे.