शाओमी ने मागच्या महिन्यात काही स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. काही दिवसांपूर्वी शाओमी ने चीनी मध्ये रेडमी एस2 स्मार्टफोन लॉन्च केला होता. त्याचप्रमाणे शाओमी आता आपला एक नवीन स्मार्टफोन भारतात आणण्याची तयारी करत आहे. रेडमी इंडिया ने आपल्या आॅफिशियल ट्वीटर हँडल वरून एक टीजर पोस्ट करून नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च होईल याची माहिती दिली. शाओमी ने घोषणा केली आहे की येणार्या 7 जूनला कपंनी भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.
शाओमी ने रेडमी इंडिया च्या ट्वीटर हँडल वरून याची माहिती दिली आहे. पण कंपनी ने हे नाही सांगितले की 7 जूनला भारतात कोणता फोन लॉन्च होईल परंतु हे मात्र स्पष्ट केले आहे की हा स्मार्टफोन एक सेल्फी सेंट्रिक फोन असेल. ट्वीटर वर टीजर पोस्ट करताना कंपनी ने हॅशटॅग सह ‘RealYou’ लिहले आहे. या हॅशटॅग मध्ये ‘वाय’ रेड कलर ने हाईलाईट करण्यात आला आहे. आम्हाला वाटते की शाओमी 7 जूनला आपल्या रेडमी वाय सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल जो ‘रेडमी वाय2’ नावाने बाजारात येईल.
Every step in your life is defined by a selfie. Find yourself, #FindYourSelfie
The BEST selfie smartphone is arriving soon. pic.twitter.com/OeQaSAI4TZ
— Redmi India (@RedmiIndia) May 14, 2018
शाओमी चीन मध्ये लॉन्च झालेल्या स्मार्टफोन रेडमी एस2 लाच भारतात रेडमी वाय2 नावाने लॉन्च करेल याची दाट शक्यता आहे. शाओमी रेडमी एस2 ला कंपनी ने दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केले आहे. एक वेरिएंट मध्ये 3जीबी ची रॅम मेमरी आणि 32जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसर्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज आहे. दोन्ही वेरिएंट ची इंटरनल स्टोरेज 256जीबी पर्यंत वाढवता येते. शाओमी ने 3जीबी रॅम वेरिंएट 999 चीनी युआन aani 4जीबी रॅम वेरिएंट 1,299 युआन मध्ये लॉन्च केला आहे. भारतीय करंसी अनुसार ही किंमत क्रमश: 10,500 रुपये आणि 13,700 रुपयांच्या आसपास आहे.
शाओमी रेडमी एस2 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा फोन पण ट्रेंड मध्ये असलेल्या 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिसप्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.99-इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन मीयूआई 9 आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे तसेच हा आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर चालतो. तर ग्राफिक्स साठी यात एड्रेनो 506 जीपीयू आहे.
फोटोग्राफी साठी शाओमी रेडमी एस2 च्या बॅक पॅनल वर डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. 4जी एलटीई, डुअल सिम व बेसिक कनेक्टिविफी फीचर्स सह फोन मध्ये 3,080एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीन मध्ये शाओमी रेडमी एस2 ग्रे, पिंक आणि गोल्ड ह्यू कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
