Home बातम्या Xiaomi ने सादर केली ‘CC’ सीरीज, फ्लिप कॅमेऱ्यासह 2 जुलैला लॉन्च होईल स्मार्टफोन

Xiaomi ने सादर केली ‘CC’ सीरीज, फ्लिप कॅमेऱ्यासह 2 जुलैला लॉन्च होईल स्मार्टफोन

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने आपल्या नव्या ‘CC’ सीरीजची घोषणा केली आहे. समोर आलेल्या माहिती नुसार या सीरीज मध्ये दोन स्मार्टफोन्स लॉन्च केले जाऊ शकतात. सीरीजच्या ऑफिशियल घोषणेआधी कंपनी चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबो वर हि टीज करत होती. टीज करत कंपनी ने Weibo वर एक फोटो पण शेयर केला होता.

मी च्या ऑफिशियल वीबो पोस्टनुसार कंपनी आपल्या CC सीरीजचे स्मार्टफोन 2 जुलै संध्याकाळी 7 वाजता चीन मध्ये लॉन्च करेल. इवेंट बीजिंग मध्ये आयोजित होईल. अधिकृतपणे लॉन्च होणाऱ्या फोनचे नाव समोर आले नाही. पण बोलले जात आहे कि या सीरीज मध्ये MI CC9 आणि Mi CC9e लॉन्च केले जाऊ शकतात.

या फोटो नुसार या नवीन सीरीज मध्ये अलीकडेच लॉन्च झालेल्या Asus 6Z प्रमाणे फ्लिप कॅमेरा मॉड्यूल दिला जाऊ शकतो. या सीरीज मध्ये दोन स्मार्टफोन्स लॉन्च केले जाऊ शकतात. आशा आहे कि या सीरीज मध्ये दोन स्मार्टफोन्स MI CC9 आणि Mi CC9e लॉन्च केले जाऊ शकतात. हे दोन्ही स्मार्टफोन्स Meitu AI एस्थेटिक लॅब आणि शाओमीच्या टेक्नोलॉजी सह येतील. दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये सेल्फी कॅमेऱ्यावर फोकस केला जाऊ शकतो.

विशेष म्हणजे Xiaomi ने MeituPic फोटो एडिटिंग ऍप बनवणाऱ्या कंपनी Meitu सह भागेदारी करून हि सीरीज सादर करण्याची घोषणा केली आहे. या सीरीजचे स्मार्टफोन खासकरून युवकांना लक्षात ठेऊन कॅमेरा सेंट्रिक बनवले जातील. कंपनी ने सांगितले कि या सीरीजचे स्मार्टफोन्स “Colourful” सोबत “Creative” पण असतील. यात ‘CC’ चा अर्थ “Chic and Cool” असल्याचे बोलले जात आहे.

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या सीरीजचा Mi CC9e वाटरड्रॉप नॉच फीचर सह लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच Mi CC9 फुल डिस्प्ले आणि फ्लिप कॅमेरा फीचर सह लॉन्च केला जाऊ शकतो. दोन्ही स्मार्टफोन्स इन-डिस्प्ले फिंगप्रिंट सेंसर सह लॉन्च केले जाऊ शकतो.

विशेष म्हणजे शाओमी ने आपली Mi Max आणि Mi Note सीरीज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती स्वतः शाओमीचे सीईओ ली जून यांनी दिली आहे. त्यांनी चिनी माइक्रोब्लॉगिंग साइट वीबो वर एक पोस्ट शेयर केली. या पोस्ट मध्ये त्यांनी म्हटले आहे कि यावर्षी या दोन्ही लाइनअपचा कोणताही नवीन मॉडेल लॉन्च करण्याचा विचार केला गेलेला नाही.