Home बातम्या 5 हजारांपेक्षा कमी किंमतीती लॉन्च झाला झोलो ईरा 4एक्स स्मार्टफोन, यात आहे फेस अनलॉक

5 हजारांपेक्षा कमी किंमतीती लॉन्च झाला झोलो ईरा 4एक्स स्मार्टफोन, यात आहे फेस अनलॉक

भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी लावाच्या ब्रँड झोलो ने भारतीय मोबाईल बाजारात एक किफायती स्मार्टफोन सादर करून वर्षाची सुरवात केली आहे. नवीन वर्षात कंपनी ने फक्त 4,444 रुपयांमध्ये झोलो ईरा 4एक्स नावाचा स्मार्टफोन सादर केला आहे. या स्मार्टफोनची विक्री ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉन इंडिया वर 9 जानेवारी पासून होईल. फोन सोबत एक शानदार ऑफर दिली जात आहे, ज्या अंतर्गत 30 दिवसांच्या आत फोन परत पण केला जाऊ शकतो.

स्मार्टफोनची खासियत म्हणजे या किंमतीती कंपनी ने ईरा 4एक्स मध्ये फिंगरप्रिंट सेंसरच्या ऐवजी फेस अनलॉक दिला आहे. कनेक्टिविटीसाठी फोन मध्ये डुअल 4जी वीओएलटीई सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच झोलो ईरा 4एक्स एंड्रॉयड 8.1 ओरियो वर चालेल.

झोलो ईरा 4एक्स स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 5.45 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्ले मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो आणि 2.5डी कर्व्ड कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन आहे. सध्यातरी कंपनी ने या फोनच्या प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज बद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

फोटोग्राफीसाठी झोलो ईरा 4एक्स मध्ये मागे 8-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅश सह येतो. फ्रंट पॅनल वर सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फ्लॅश सोबत 5-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेऱ्याच्या मदतीने युजर आपला फोन फेस अनलॉक करू शकतो. तसेच पावर बॅकअप साठी झोलो ईरा 4एक्स मध्ये 3,000 एमएएच ची बॅटरी आहे आणि हि स्टॅन्डर्ड चार्जिंग सपोर्ट सह येतो.