Home बातम्या 120KM रेंजसह दोन स्वस्त Electric Scooter लाँच; फक्त 10 हजार देऊन करा बुक

120KM रेंजसह दोन स्वस्त Electric Scooter लाँच; फक्त 10 हजार देऊन करा बुक

120km range electric scooter evtric ride hs and mighty pro affordable battery scooty launched price top speed sale

Affordable Electric Scooter Launch India: इलेक्ट्रिक स्कूटर्सची वाढती मागणी पाहता एका मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक व्हेईकल ब्रँड ईवीट्रिक मोटर्स (evtric motors) नं आपल्या दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर EVTRIC Ride HS आणि EVTRIC Mighty Pro लाँच केल्या आहेत. जर तुम्ही एक अफोर्डेबल बॅटरी असलेली स्कूटी विकत घेण्याचा विचार करत असाल तर यातील एकीची निवड करू शकता. कंपनीनं दावा केला आहे की या दोन्ही हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहेत, ज्या किफायतशीर किंमतीत 120KM पर्यंतची रेंज देतात. चला जाणून घेऊया या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरची संपूर्ण माहिती.

EVTRIC Ride HS आणि EVTRIC Mighty Pro लाँच

दोन्ही ई-स्कूटर एक्सपो सेंटर, ग्रेटर नोयडामध्ये आयोजित ईव्ही इंडिया एक्सपो 2022 मध्ये लाँच करण्यात आल्या आहेत. शानदार फीचर्स असलेल्या या इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये शानदार टेक्नालॉजी देण्यात आली आहे. या दोन्ही ई-स्कूटर मेंलिथियम-आयन रिमूव्हेबल बॅटरी देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया या ईव्ही मधील फीचर्स जे यांना खास बनवतात. हे देखील वाचा: Honda Activa येणार Electric अवतारात; बजेटमध्ये मिळणार मोठी ड्राइव्हिंग रेंज

EVTRIC Ride HS आणि EVTRIC Mighty Pro ची किंमत आणि बुकिंग

EVTRIC Ride HS कंपनीनं Rs 81,838 (ex-showroom India) आणि EVTRIC Mighty Pro Rs 79,567 (ex-showroom India) मध्ये सादर केला आहे. लाँचच्या वेळी कंपनीनं या स्कूटर्सची किंमत तर सांगितली तसेच या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या बुकिंग डिटेलचा खुलासा देखील करण्यात आला आहे. कंपनीनुसार यांची बुकिंग रक्कम 10 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. इच्छुक ग्राहक या इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीच्या ऑफिसियल वेबसाइट किंवा नजीकच्या डीलरशिपवर जाऊन बुक करू शकतात.

EVTRIC Ride HS चे स्पेसिफिकेशन्स आणि खासियत

EVTRIC Ride HS पाहता लुकच्या बाबतीत ही खूप शानदार दिसते. तसेच या ई-स्कूटरमध्ये टॉप स्पीड ताशी 55 किलोमीटर आहे आणि ही सिंगल चार्जमध्ये 120 किलोमीटर अंतर गाठू शकते. ही ईव्ही 4 तासांमध्ये फुल चार्ज होते. तसेच कंपनीनं ही ब्लॅक, व्हाइट आणि ग्रे सारख्या कलर्समध्ये सादर केली आहे. हे देखील वाचा: ही कंपनी देत आहेत मोफत Electric Scooter, अशी आहे ही भन्नाट ऑफर

EVTRIC Mighty Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि खासियत

EVTRIC Mighty Pro बद्दल बोलायचं झालं तर ही सहज ताशी 65 किमीचा टॉपस्पिड गाठू शकते. तसेच ही ई-स्कूटर देखील एकदा चार्ज झाल्यावर 120KM ची रेंज देते. ही ई-स्कूटर रेड, व्हाइट आणि ग्रे कलरमध्ये उपलब्ध होईल. EVTRIC Ride HS प्रमाणेच या ई-स्कूटर मध्ये देखील लिथियम-आयन बॅटरी मिळेल.