Nothing Phone (1) स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वरून अत्यंत स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 13,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल. नथिंगचा हा फोन आपल्या हटके डिजाइन, दमदार परफॉर्मन्स आणि शानदार कॅमेऱ्यासाठी ओळखला जातो. Nothing Phone (1) चे फीचर्स पाहता या फोनमध्ये Qualcomm चा प्रोसेसर आणि 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. पुढे आम्ही तुम्हाला या स्मार्टफोनवर मिळणाऱ्या ऑफर्सची माहिती दिली आहे.
Nothing Phone (1) ऑफर्स
Nothing Phone (1) स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 37,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. या फोनवर 26 टक्के (10,000 रुपये) डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे फोनची किंमत कमी होऊन 26,999 रुपये होते. फोनवर Bank of Baroda च्या क्रेडिट कार्ड धारकांना 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तसेच Federal Bank च्या क्रेडिट कार्डवर 3000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. बँक ऑफर्ससह या फोनची इफेक्टिव किंमत 23,999 रुपये होते. तसेच तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून अतिरिक्त सूट देखील मिळवू शकता. नथिंगचा हा फोन फ्लिपकार्टवरून ईएमआयवर देखील विकत घेता येईल. हे देखील वाचा: अत्यंत कमी किंमतीत मिळणार 128 जीबी मेमरी; Realme करत आहे चाहत्यांना खुश करण्याची तयारी
Nothing Phone (1) चे दमदार स्पेसिफिकेशन्स
- 6.55-inch FHD+ AMOLED डिस्प्ले
- Qualcomm Snapdragon 778G+
- 12GB पर्यंत RAM, 256GB पर्यंत स्टोरेज
- Android 12 OS
- 50MP + 50MP ड्युअल रियर कॅमेरा
- 16MP सेल्फी कॅमेरा
- 4,500mAh बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग
Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा 10-bit OLED पॅनल देण्यात आला आहे, जो 120Hz अडॅप्टिव रिफ्रेश रेट, 2400×1080 पिक्सल रेजलूशन, HDR10+, 402PPI, आणि 1200 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसरची ताकद मिळते. सोबतीला Adreno 642L GPU देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12GB पर्यंतचा LPDDR5 RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. हे देखील वाचा: COVID Nasal Vaccine: इंजेक्शन नको मग नाकावाटे घ्या कोरोना बूस्टर डोस; असं करा ऑनलाइन बुकिंग
Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) आणि इलेक्ट्रिक इमेज स्टेबलाइजेशन (EIS) ला सपोर्ट करतो. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX766 सेन्सर आणि सेकंडरी कॅमेरा 50MP Samsung JN1 अल्ट्रा वाईड सेन्सर आहे. तसेच फोनच्या फ्रंटला 16MP Sony IMX471 सेन्सर देण्यात आला आहे. फोनमधील 4,500mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आली आहे. तसेच फोन 15W Qi वायरलेस चार्जिंग आणि 5W रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.
