128 जीबी मेमरीसह येऊ शकतो Realme C33 चा नवा व्हेरिएंट

Realme C33 All Color Varients

रियलमीनं सप्टेंबरमध्ये भारतात आपल्या ‘सी’ सीरीज अंतगर्त Realme C33 स्मार्टफोन लाँच केला होता. हा मोबाइल फोन 50MP Camera आणि 5,000mAh Battery सह आला होता जो 32GB Storage आणि 64GB Storage ऑप्शनसह उपलब्ध आहे. परंतु आता बातमी येत आहे कंपनी फोनचा अजून एक नवीन 128GB Storage व्हेरिएंट देखील लाँच करू शकते जो लवकरच भारतात सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

Realme C33 स्मार्टफोन सध्या दोन व्हेरिएंट्समध्ये विकला जात आहे. यात 3GB RAM + 32GB Storage वेरिंएटची किंमत 8,999 रुपये आणि 4GB RAM + 64GB Storage ची किंमत 9,999 रुपये आहे. समोर आलेल्या नवीन लीकनुसार रियलमी सी33 128जीबी स्टोरेज व्हेरिएंट देखील लवकरच लाँच होऊ शकतो आणि हा नवीन मॉडेल सर्टिफिकेशन साइट BIS वर RMX3627 मॉडेल नंबरसह लिस्ट देखील झाला आहे.या नवीन व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये असू शकते, अशी आशा आहे. हे देखील वाचा: बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी येतोय मोटोरोलाचा सर्वात स्वस्त 5G Phone; Moto G13 ची माहिती लीक

50 Mp camera phone Realme C33 cheap price specifications sale offer deals details

Realme C33 Specifications

  • 6.5” Display
  • 50MP Rear Camera
  • 4GB RAM
  • Unisoc T612
  • 5,000mAh Battery

रियलमी सी33 स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर झाला आहे जो 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 60हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 88.7% स्क्रीन-टू-बॉडी रेशियो व 16.7एम कलर सारख्या फीचर्सना सपोर्ट करते.

फोटोग्राफीसाठी रियलमी सी33 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.8 अपर्चर असलेल्या 0.3 मेगापिक्सल सेकंडरी लेन्ससह येतो. Realme C33 मध्ये 5MP चा Selfie Camera आहे.

50 Mp camera phone Realme C33 cheap price specifications sale offer deals details

Realme C33 नवीन अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच करण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 1.82गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc T612 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा मोबाइल फोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. भारतात रियलमी सी33 3 जीबी रॅम व 4 जीबी रॅमसह लाँच करण्यात आला आहे. हे देखील वाचा: Jio ची दणकट न्यू ईयर ऑफर; 23 दिवस मोफत वापरा 5G स्पीडनं डेटा, कॉलिंग आणि एसएमएस

हा ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 3.5एमएम जॅक व ओटीजी सपोर्टसह बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. सिक्योरिटीसाठी हा फोन साइड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रियलमी सी33 मध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 37 दिवसांचा स्टँडबाय टाइम देते, असा दावा कंपनीनं केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here