गेल्या काही महिन्यांपासून ओप्पो रेनो 10 सीरीजबद्दल खूप बातम्या येत आहेत. तसेच आज या सीरीजच्या सर्वात शक्तिशाली फोन Oppo Reno 10 Pro Plus बद्दल मोठा खुलासा झाला आहे. लीकच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार हा फोन ओएलईडी डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो. तसेच फोनमध्ये 16 जीबी रॅम मिळू शकतो. फोनमधील कॅमेऱ्याची माहिती देखील समोर आली आहे.
ओप्पो रेनो 10 प्रो प्लसची लीक माहिती
- 6.74 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले
- 8 एमपीचा अल्ट्रावाइड कॅमेरा
- 64 एमपीचा पेरिस्कोप सेन्सर
- 4700 एमएएचची बॅटरी
- 80 वाॅट फास्ट चार्जर
- 512 जीबी स्टोरेज
Oppo Reno Pro Plus ची नवीन लीक माहिती डिजिटल चॅट स्टेशनच्या माध्यमातून आली आहे. त्यानुसार कंपनी हा फोन क्वालकाॅम स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 प्रोसेसरसह सादर करू शकते. त्याचबरोबर फोनमध्ये तुम्हाला 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला 6.74 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले मिळू शकतो आणि कंपनी यात 1.5के स्क्रीन रिजोल्यूशनचा वापर करू शकते.
कॅमेरा पाहता, हा फोन 50 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेन्सरसह येऊ शकतो आणि कंपनी सोनी आयएमएक्स890 लेन्सचा वापर करू शकते. तसेच 8 एमपीचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 64 एमपीची पेरिस्कोप झूम लेन्स असू शकते ज्यात 2एक्स का ऑप्टिकल झूम सपोर्ट दिला जाऊ शकतो.
ओप्पो रेनो 10 प्रो प्लसचे काही लीक्स याआधी देखील आले आहेत त्यानुसार फोनमध्ये तुम्हाला 4700 एमएएचची बॅटरी मिळू शकते. जोडीला 80 वाॅट फास्ट चार्जर दिला जाऊ शकतो. तसेच हा फोन 16जीबी रॅमसह 512 जीबी स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. कंपनी यात यूएफएस 3.1 स्टोरेज टेक्नॉलॉजी देऊ शकते. यूएफएस म्हणजे युनिव्हर्सल फ्लॅश स्टोरेज आणि 3.1 व्हर्जन फास्ट डेटा ट्रांस्फरसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे आशा आहे की युजर्सना एक चांगला एक्सपीरियंस मिळू शकेल.
लाँच टाइम
कंपनी ओप्पो रेनो 10 सीरीज मे मध्ये लाँच करू शकते. या सीरीजमध्ये रेनो 9 प्रमाणेच तीन फोन येऊ शकतात ज्यात ओप्पो रेनो 10 सह ओप्पो रेनो 10 प्रो आणि ओप्पो रेनो 10 प्रो प्लसचा समावेश असू शकतो.
