Home Featured 2018 चे 5 प्रीमियम फीचर्स जे 2019 मध्ये येतील स्वस्तातल्या फोन मध्ये

2018 चे 5 प्रीमियम फीचर्स जे 2019 मध्ये येतील स्वस्तातल्या फोन मध्ये

वर्ष 2019 सुरु होऊन एक महिना झाला आहे आणि आता परिस्तिथी स्पष्ट झाली आहे कि नवीन वर्षात कोणत्या प्रकारची टेक्नॉलॉजी येणार आहे. आता आम्ही म्हणू शकतो कि डुअल डिस्प्ले आणि 5जी फोनची चर्चा वर्षभर असेल. परंतु काही अशाही टेक्नॉलॉजी असतील ज्या स्वस्त होतील. आम्ही इथे नव्या टेक्नॉलॉजीचा उल्लेख करत नाही तर काही टेक्नॉलॉजीज बद्दल सांगणार आहोत ज्या गेल्यावर्ष्यापर्यंत खास होत्या पण नवीन वर्षात ट्रेंड बनतील.

1. पॉपअप कॅमेरा

सर्वात आधी मी पॉपअप कॅमेऱ्याबद्दल बोलेन. गेल्यावर्षी लॉन्च वीवो नेक्स फोन मध्ये सर्वात आधी आपण पॉपअप कॅमेरा बघितला होता जो थोडा महाग होता. परंतु नवीन वर्षात हे फीचर सहज उपलब्द होईल. अलीकडेच बातमी आली आहे कि कंपनी वीवो वी15 प्रो आणि वीवो वी15 सह कमी रेंज मध्ये पॉपअप कॅमेरा फोनची सुरवात करू शकते. पॉपअप कॅमेरा दिसत नाही बॉडी मध्ये लपून असतो. परंतु जेव्हा तुम्ही सेल्फी ऑन करता हा बॉडीच्या बालहर येतो.

2. स्लाइड आउट कॅमेरा

2018 मध्ये स्लाइड आउट कॅमेरा खूप चर्चेत होता. ओपो, ऑनर आणि शाओमी सारख्या कंपन्यांनी स्लाइड आउट कॅमेरा असलेले फोन लॉन्च केले. पण फक्त ओपोचा फाइंड एक्स भारतात उपलब्ध झाला परंतु यावर्षी अजून पण अनेक फोन लॉन्च होणार आहेत ज्यात स्लाइड आउट कॅमेरा असेल आणि ते थोड्या कमी बजेट मध्ये येतील. यात पण फ्रंटला देण्यात येणार सेल्फी कॅमेरा लपलेला असतो पण तुम्ही फोन स्लाइड केल्यावर तो समोर दिसू लागतो. याचा फायदा असा कि कंपन्या छोटे डिजाइन मध्ये पण मोठी स्क्रीन देऊ शकतात.

3. पंच होल स्क्रीन

नॉच पासून एक स्टेप पुढे जात वर्ष 2019 मध्ये पंच होल डिस्प्ले वाले फोन पण ट्रेंड बनतील. याची सुरवात सॅमसंग ने गॅलेक्सी एस8एस पासून केली आहे पण हा फोन आतापर्यंत भारतात आलेला नाही. भारतात ऑनर ने व्यू 20 पहिला फोन आहे जो पंच होल डिस्प्ले सह सादर केला गेला आहे. जरी हा थोडा महाग असला तरी पंच होल असलेले फोन वर्षाच्या शेवटीपर्यंत 15,000 रुपयांच्या बजेट मध्ये येतील. नॉच स्क्रीनच्या मध्ये असते तर पंच होल अंतर्गत स्क्रीनवर एखाद्या जागी एक छिद्र करण्यात येते आणि तिथे सेल्फी कॅमेरा दिला जातो.

4. ट्रिपल कॅमेरा

कॅमेरा नेहमीच ट्रेंडिंग फीचर राहिला आहे आणि 2019 मध्ये पण याची महत्वाची भूमिका असेल. सर्वात खास बाब म्हणजे गेल्यावर्षी डुअल कॅमेरा फोनची चर्चा जात होती तर यावेळी ट्रिपल कॅमेरा फोन चर्चेत असतील. सॅमसंग ने गॅलेक्सी ए7 ने कमी रेंज मध्ये याची सुरवात केली होती. तसेच आता वीवोच्या नवीन फोन वी15 आणि वी15 प्रो मध्ये पण याची चर्चा आहें.

5. इनडिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर

आधी चित्रपटात बघत होतो कि स्क्रीन वर हात लावला आणि डिवाइस अनलॉक झाला. 2018 मध्ये हि कल्पना पण सत्यात आली. वीवो ने एक्स21 मांडेल पासून याची सुरवात केली होती. त्यानंतर ओपो, वनप्लस आणि शाओमी सारख्या कंपन्यांनी ने आपल्या फोन मध्ये इनडिस्प्ले फिंगरप्रिंटचा वापर केला. 2019 मध्ये हि टेक्नॉलॉजी अजून जास्त प्रसिद्ध होणार आहे कारण लोकांना आता कमी बजेट मध्ये हे प्रीमियम फीचर मिळेल.