iPhone 16 सीरीजवर मिळेल 5,000 रुपयांचा कॅशबॅक, आणि 6 महिन्यांची नो कॉस्ट EMI ऑफर, जाणून घ्या कसे मिळवायचे

iPhone 16 सीरीज भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होत आहे. उद्या म्हणजेच 13 सप्टेंबरपासून ॲपलचे चाहते iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max बुक करू शकतील. नवीन आयफोनची विक्री सुरू होण्याआधीच कंपनीने त्यांच्यावर ऑफर्सचा धडाका लावला आहे. iPhone 16 सीरीज वर कॅशबॅक आणि नो कॉस्ट ईएमआय सारख्या ऑफर्स चालवल्या गेल्या आहेत, ज्याचे तपशील तुम्ही पुढे वाचू शकता.

आयफोन 16 सीरीजची किंमत

आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लस ची किंमत

आयफोन मॉडल लॉच किंमत डिस्काउंट इफेक्टिव किंमत
iPhone 16 128GB Storage ₹79,900 ₹5,000 ₹74,900
256GB Storage ₹89,900 ₹5,000 ₹84,900
512GB Storage ₹1,09,900 ₹5,000 ₹1,04,900
iPhone 16 Plus 128GB Storage ₹89,900 ₹5,000 ₹84,900
256GB Storage ₹99,900 ₹5,000 ₹94,900
512GB Storage ₹119,900 ₹5,000 ₹1,14,900

 

आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लस 13 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असतील, जे या तारखेला संध्याकाळी 5:30 वाजेपासून बुक करता येतील. प्री-ऑर्डरनंतर येणाऱ्या 20 सप्टेंबरपासून या दोन्ही मोबाईलची विक्री सुरू होईल. आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लस हे अल्ट्रामॅरिन, टील, गुलाबी, पांढरा आणि काळ्या रंगात खरेदी केले जाऊ शकतात. आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लस फिचर्स आणि स्पेसिफिकेशन बद्दलच्या माहितीसाठी (येथे क्लिक करा)

आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स ची किंमत

आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स देखील 13 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असतील, जे उद्या संध्याकाळी 5.30 वाजेपासून बुक केले जाऊ शकतात. या मोबाईलची विक्रीही 20 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. नवीन आयफोन सीरीजमधील प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल्स व्हाईट टायटॅनियम, नॅचरल टायटॅनियम, डेझर्ट टायटॅनियम आणि ब्लॅक टायटॅनियम रंगांमध्ये खरेदी केले जाऊ शकतात.

आयफोन 16 सीरीज वरील ऑफर्स

कॅशबॅक डिस्काऊंट

आयफोन 16 सीरीजवर कंपनीकडून 5,000 रुपयांचा झटपट कॅशबॅक दिला जात आहे. ही सवलत फक्त निवडक बँक कार्डांवर उपलब्ध असेल ज्यात आयसीआयसीआय बँक आणि ॲक्सिस बँक तसेच अमेरिकन एक्सप्रेस कार्डचा समावेश असेल.

एक्सचेंजचा लाभ

तुम्हाला सांगतो की जर तुम्ही Apple Trade In च्या बदल्यात कोणताही जुना आयफोन दिला तर कंपनीकडून कमीतकमी 4,000 रुपयांची एक्सचेंज व्हॅल्यू दिली जाईल. तर सेकंड हँड आयफोनच्या स्थितीनुसार ही किंमत 67,500 रुपयांपर्यंत ही जाऊ शकते.

ईएमआय

आयफोन 16 ईएमआय वर विकत घ्यायचा असेल तर कंपनीकडून त्याला 3 महिने आणि 6 महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआय वर विकले जाईल. या सुविधेसाठी देखील वरील कार्ड्सचा वापर करावा लागेल. तुम्हाला सांगतो की जर तुम्ही आयफोन 16 हा 6 महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआयवर विकत घ्यायचा असेल तर, दर महिन्याला त्याला 12,483 रुपयांचा हप्ता असेल. 12483 x 6 = 74,898 म्हणजेच मोफत ईएमआय सह 5 हजार रुपयांचा फायदा होईल.

आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लसचे स्पेसिफिकेशन

आयफोन 16 मध्ये 6.1 इंचाची आणि आयफोन 16 प्लस मध्ये 6.7 इंचाची सुपर रेटिना एक्सडीआर स्क्रीन आहे जी ओएलईडी पॅनेलवर बनलेली आहे. त्यावर 2,000 निट्स ब्राईटनेस, एचडीआर10 आणि डॉल्बी व्हिजन सारखे फिचर्स मिळत आहेत. आयओएस 18 सोबत या दोन्ही आयफोन्स मध्ये Apple A18 Bionic चिपसेट दिला गेला आहे. फोटोग्राफीसाठी त्यांच्या मागील पॅनलवर 48 मेगापिक्सेलचा फ्यूजन सेन्सर आणि 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड दिला गेला आहे, तर समोर 12 मेगापिक्सेलचा सेन्सर उपलब्ध आहे. दोन्ही मोबाईल मॅगसेफ वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतात.

आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्सचे स्पेसिफिकेशन

आयफोन 16 प्रो मध्ये 6.3 इंचाची आणि आयफोन 16 प्रो मॅक्स मध्ये 6.9 इंचाची सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी स्क्रीन आहे जी 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. आयओएस 18 सोबत हे दोन्ही iPhone Apple A18 Pro Bionic चिपसेटवर काम करतात. फोटोग्राफीसाठी मागील पॅनलवर 48 मेगापिक्सेलचा मुख्य सेन्सर, 48 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आणि 12 मेगापिक्सेलची टेलिफोटो लेन्स मिळत आहे. हे आयफोन्स 12 मेगापिक्सेलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. यामध्ये मॅगसेफ वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञान देखील उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here