5G टेक्नॉलॉजी आणि अल्ट्रा बाऊंस 360 डिग्री अँटी-ड्रॉप रेजिस्टेंस टेक्नॉलॉजी असलेला स्मार्टफोन खरेदी करणार आहात तर Honor X9b चांगला पर्याय आहे. विशेष म्हणजे मोबाईलला ऑनलाईन शॉपिंग साईट अॅमेझॉनवर 6,000 रुपयांच्या बँक ऑफरसह विकला जात आहे. म्हणजे तुम्हाला या लाँचच्या किंमतीपेक्षा खूप स्वस्त किंमतीमध्ये विकत घेता येईल. चला, पुढे डिव्हाईसची वैशिष्ट्ये, किंमत आणि सर्व ऑफर सविस्तर जाणून घेऊया.
Honor X9b 5G ऑफरची माहिती
- ऑनरचा हा मोबाईल फोन 8GB रॅम +256 जीबी स्टोरेज क्षमतेसह 25,999 मध्ये लाँच झाला होता. यावर सध्या 6,000 रुपयांचा बँक डिस्काऊंट प्रदान केला जात आहे.
- 6,000 च्या मोठ्या बँक ऑफर सह ग्राहक डिव्हाईसला मात्र 19,998 रुपयांमध्ये खरेदी करू शकतील.
- तसेच हा फ्लॅट सूट तुम्हाला कोणत्याही बँक क्रेडिट कार्ड, क्रेडिट कार्ड EMI, डेबिट कार्ड, डेबिट कार्ड ईएमआय पेमेंटवर मिळेल.
- Honor X9b 5G वर कंपनी नो कॉस्ट EMI ऑप्शन पण प्रदान करत आहे ज्याच्या मदतीने 3 ते 6 महिने त्यामुळे सुलभ हप्त्यांवर फोन खरेदी करता येईल.
- एक्सचेंज ऑफर पाहता तुमच्या जुन्या डिव्हाईसवर 23,600 रुपये पर्यंतचा बोनस मिळू शकतो, परंतु हा कंडीशनवर आधारित असेल.
- कलर ऑप्शन पाहता Honor X9b मिडनाईट ब्लॅक आणि सनराईज ऑरेंज सारख्या दोन पर्यायामध्ये येतो.
काय तुम्हाला Honor X9b 5G खरेदी करायचा आहे
Honor X9b 5G भारतीय बाजारात फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये लाँच केला होता. यानुसार हा एक लेटेस्ट फोन आहे. यात 1.5 के अॅमोलेड डिस्प्ले, 108 मेगापिक्सल प्रायमरी रिअर कॅमेरा, 5800mAh ची मोठी बॅटरी, अल्ट्रा-बाऊंस 360-डिग्री अँटी-ड्रॉप रेजिस्टेंस आणि अत्याधुनिक कुशनिंग टेक्नॉलॉजी सारखे अनेक फिचर्स आहेत.
Honor X9b 5G चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: Honor X9b 5G मध्ये 1.5k रिजोल्यूशन असलेला 6.78-इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर 120Hz रिफ्रेश रेट आणि 1920Hz PWM डिमिंग व 1200 निट्स पीक ब्राईटनेस मिळेल.
- चिपसेट: ऑनर एक्स 9 बी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 SoC सह येतो. ज्यात 2.2GHz क्लॉक स्पीड मिळते. त्याचबरोबर एड्रेनो A710 GPU आणि एक बिल्ट-इन 5G मॉडेम देण्यात आले आहे.
- स्टोरेज आणि रॅम: फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. हेच नाही तर रॅमला 8GB पर्यंत वाढविले पण जाऊ शकते.
- कॅमेरा: Honor X9b 5G च्या बॅक पॅनलवर 108MP चा प्रायमरी सेन्सर आहे ज्याला 5MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो यूनिट सह जोडले गेले आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हँडसेट मध्ये 16MP ची लेन्स आहे.
- बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत HONOR X9b मध्ये 5,800 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. याला चार्ज करण्यासाठी 35 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे.
- ओएस: Honor X9b 5G अँड्रॉईड 13 आधारित मॅजिक ओएस 7.2 वर चालतो. याला दोन वर्षाचे प्रमुख सॉफ्टवेअर अपग्रेड आणि तीन वर्षाचे सुरक्षा अपडेट मिळतील.