Realme GT Neo5 Launch: मोबाइल इंडस्ट्रीमधील फास्ट चार्जिंग सर्व विक्रम मागे टाकत रियलमीनं आज जगातील पहिला 240W Fast Charging टेक्नॉलॉजी असलेला स्मार्टफोन जीटी नियो 5 लाँच केला आहे. सध्या चीनमध्ये आलेला हा फोन फेब्रुवारीच्या अखेरीस भारतात Realme GT 3 नावाने लाँच होईल अशी बातमी देखील आली आहे. Realme GT Neo5 मध्ये 16GB RAM, Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर, 144Hz display आणि 50MP Camera असे दमदार स्पेसिफिकेशन्स मिळतात. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती.
Realme GT Neo5 Price
Realme GT Neo5 चे एकूण पाच व्हेरिएंट आले आहेत. यातील मॉडेलमध्ये 240W आणि 16GB रॅम मिळतो. यातील 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3,199 युआन (जवळपास 39,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर 1TB स्टोरेजसाठी 3,499 युआन (जवळपास 42,500 रुपये) मोजावे लागतील.
150W फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo5 चे व्हेरिएंट आले आहेत. यातील 8GB RAM व 256GB storage मॉडेलची किंमत 2,499 युआन (जवळपास 30,500 रुपये), 12GB RAM व 256GB स्टोरेज 2,699 युआन (जवळपास 32,900 रुपये) आणि 16GB RAM व 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत किंमत 2,899 युआन (जवळपास 35,300 रुपये) आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमी नव्हे टेक्नो घालणार बजेटमध्ये धमाकूळ; येतोय स्वस्त आणि सुंदर Tecno Pop 7 Pro
Realme GT Neo5 Specifications
- 6.74″ 144Hz display
- 16GB RAM + 1TB storage
- Qualcomm Snapdragon 8+ Gen 1
- 50MP Triple Rear Camera
रियलमी जीटी नियो 5 स्मार्टफोन 2772 x 1240 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.74 इंचाच्या मोठ्या 1.5के डिस्प्लेला सपोर्ट करतो. पंच-होल स्टाईल ही स्क्रीन अॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 144हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1500हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. या स्क्रीनवर 100% DCI-P3, 1.07बिलियन कलर्स आणि 5,000,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सारखे फीचर्स मिळतात.
Realme GT Neo5 क्वॉलकॉमच्या 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच झाला आहे जो 3.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी या मोबाइल फोनमध्ये एड्रेनो जीपीयू 730 जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआय 4.0 वर चालतो, तसेच यात LPDDR5X RAM आणि UFS 3.1 ROM टेक्नॉलॉजी आहे.
फोटोग्राफीसाठी रियलमी जीटी नियो5 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.88 अपर्चर असलेला 50MP Sony IMX 890 OIS प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि एफ/3.3 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 6,000mAh ची अवाढव्य बॅटरी पण किंमत 7 हजार; Infinix Smart 7 ची भारतीय लाँच डेट आली समोर
Realme GT Neo5 ची खासियत म्हणजे फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी. कंपनीनं या फोनचे दोन मॉडेल सादर केले आहेत. एका मॉडेलमध्ये 240वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 4,600एमएएच बॅटरी आहे. हा फोन फक्त 8 मिनिटांत फुल चार्ज होऊ शकते. तर दुसरा रियलमी जीटी नियो5 150वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.
