6,000mAh ची अवाढव्य बॅटरी पण किंमत 7 हजार; Infinix Smart 7 ची भारतीय लाँच डेट आली समोर

Highlights

  • Infinix SMART 7 भारतात 22 फेब्रुवारीला लाँच होईल.
  • या फोनची किंमत 7,499 रुपये असू शकते.
  • इनफिनिक्स स्मार्ट 7 मध्ये 6,000एमएएचची बॅटरी दिली जाईल.
  • हा मोबाइल 6.6 इंचाच्या लार्ज डिस्प्लेला सपोर्ट करेल.

स्वस्त स्मार्टफोन बनवणारा टेक ब्रँड इनफिनिक्स भारतीय बाजारात आपला आणखी एक लो बजेट मोबाइल फोन आणण्यासाठी तयार आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की ते नवीन स्मार्टफोन Infinix Smart 7 भारतात लाँच करणार आहेत जो 22 फेब्रुवारीला मार्केटमध्ये येईल. लाँच डेट सोबतच इनफिनिक्स स्मार्ट 7 ची प्राइस आणि फोनचे अनेक महत्वाचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स देखील सांगितले आहेत.

Infinix Smart 7 Price

इनफिनिक्स इंडियानं सांगितलं आहे की कंपनी येत्या 22 फेब्रुवारीला Infinix Smart 7 भारतात लाँच करेल. ‘स्मार्ट’ सीरीजमध्ये जोडल्या जाणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत 7.5 हजार रुपयांपेक्षा कमी ठेवली जाईल, अशी माहिती इनफिनिक्सनं दिली आहे. आम्हाला आशा आहे की फोनची प्राइस 7,499 रुपये असेल. ही स्मार्ट 7 ची प्रारंभिक किंमत असू शकते तसेच मोठ्या व्हेरिएंटची किंमत 8 ते 9 हजारांत असू शकते. हे देखील वाचा: इतक्या स्वस्तात 16GB RAM! भारतात गुपचूप सुरु झाली Vivo Y100 विक्री; कॅमेरा आहे जबरदस्त

Infinix Smart 7 Specifications

  • 6.6″ HD+ display
  • 6,000mAh battery
  • Dual Rear Camera
  • 4GB RAM + 64GB storage

Infinix Smart 7 स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा मोठा एचडी+ रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले देण्यात येईल. जो 400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करेल. हा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असेल, अर्थात वरच्या बाजूला मध्यभागी ‘व्ही’ शेप नॉचमध्ये सेल्फी कॅमेरा पाहायला मिळेल. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस असतील तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट मिळेल. फोनच्या बॅक पॅनलवर wave pattern डिजाइन असेल.

इनफिनिक्स स्मार्ट 7 भारतीय बाजारात 4 जीबी रॅमसह लाँच केला जाईल जोडीला 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. हा फोन एकापेक्षा जास्त मेमरी व्हेरिएंटमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. फोनची बॅटरी याची मोठी खासियत असेल. कंपनीनं सांगितलं आहे की Smart 7 स्मार्टफोन 6,000एमएएचच्या पावरफुल बॅटरीसह मार्केटमध्ये लाँच केला जाईल. त्याचबरोबर यात फास्ट चार्जिंग देखील मिळू शकते. हे देखील वाचा: रेडमी-रियलमी नव्हे टेक्नो घालणार बजेटमध्ये धमाकूळ; येतोय स्वस्त आणि सुंदर Tecno Pop 7 Pro

Infinix Smart 7 फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनबद्दल कंपनीचा दावा आहे की हा Silver-ion spray कोटेड आहे जो 99 टक्क्यांपर्यंत अँटीबॅक्टीरियल आहे. सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर फोनच्या बॅक पॅनलवर दिला जाईल. तर उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकरसह पावर बटन असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here