Home बातम्या 6 डिसेंबरला भारतात लाँच होईल हा स्वस्त Redmi फोन, मिळेल 50MP Camera

6 डिसेंबरला भारतात लाँच होईल हा स्वस्त Redmi फोन, मिळेल 50MP Camera

Xiaomi सब-ब्रँड Redmi भारतात आपला नंबर सीरीजचा नवीन स्मार्टफोन घेऊन येणार आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की येत्या 6 डिसेंबरला भारतात Redmi 13C स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा लो बजेट स्मार्टफोन 50MP Camera सह देशात एंट्री घेणार आहे, ज्याचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह तसेच किंमतीची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Redmi 13C भारतात लाँचची सर्व माहिती

कंपनीने याबबात अधिकृत घोषणा करत सांगितले आहे की, रेडमी 13सी 6 डिसेंबरला भारतात लाँच होईल. फोनचे प्रोडक्ट पेज पण कंपनी वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आले आहे. तिथे ‘नोटिफाय मी‘ बटन देण्यात आले आहे. या पेजवर फोनचे फोटो शेअर करत कंपनीने हा खुलासा पण केला आहे की रेडमी 13सी Stardust Black आणि Star Shine Green कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Redmi 13C भारतातील किंमत

सर्वप्रथम रेडमी 13 सी काही दिवसांपूर्वी ग्लोबली लाँच झाला आहे. हा स्मार्टफोन नायजेरिया मध्ये उपलब्ध झाला आहे, जिथे याची प्रारंभिक किंमत भारतीय करंसीनुसार 10,100 रुपयांच्या आसपास आहे. या किंमतीत फोनचा 4GB RAM मॉडेल मिळतो. तसेच आशा आहे की Redmi 13C भारतातील किंमत 10 हजार रुपयांच्या बजेटमध्ये असू शकते.

Redmi 13C स्पेसिफिकेशन्स (ग्लोबल)