6 डिसेंबरला भारतात लाँच होईल हा स्वस्त Redmi फोन, मिळेल 50MP Camera

Xiaomi सब-ब्रँड Redmi भारतात आपला नंबर सीरीजचा नवीन स्मार्टफोन घेऊन येणार आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की येत्या 6 डिसेंबरला भारतात Redmi 13C स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा लो बजेट स्मार्टफोन 50MP Camera सह देशात एंट्री घेणार आहे, ज्याचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह तसेच किंमतीची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Redmi 13C भारतात लाँचची सर्व माहिती

कंपनीने याबबात अधिकृत घोषणा करत सांगितले आहे की, रेडमी 13सी 6 डिसेंबरला भारतात लाँच होईल. फोनचे प्रोडक्ट पेज पण कंपनी वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आले आहे. तिथे ‘नोटिफाय मी‘ बटन देण्यात आले आहे. या पेजवर फोनचे फोटो शेअर करत कंपनीने हा खुलासा पण केला आहे की रेडमी 13सी Stardust Black आणि Star Shine Green कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Redmi 13C भारतातील किंमत

सर्वप्रथम रेडमी 13 सी काही दिवसांपूर्वी ग्लोबली लाँच झाला आहे. हा स्मार्टफोन नायजेरिया मध्ये उपलब्ध झाला आहे, जिथे याची प्रारंभिक किंमत भारतीय करंसीनुसार 10,100 रुपयांच्या आसपास आहे. या किंमतीत फोनचा 4GB RAM मॉडेल मिळतो. तसेच आशा आहे की Redmi 13C भारतातील किंमत 10 हजार रुपयांच्या बजेटमध्ये असू शकते.

Redmi 13C स्पेसिफिकेशन्स (ग्लोबल)

  • स्क्रीन: रेडमी 13सी स्मार्टफोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.74 इंच की एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्क्रीन आयपीएस एलसीडीवर बनला आहे जो 90 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालतो.
  • प्रोसेसिंग : हा रेडमी फोन अँड्रॉइड 13 आधारित मीयुआय 14 वर सादर करण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी यात 9 एनएम फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी 99 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.0 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड वर चालतो.
  • मेमरी: नायजेरिया मध्ये हा फोन 4GB, 6GB आणि 8GB RAM वर लाँच करण्यात आला आहे जो 128GB आणि 256GB storageला सपोर्ट करतो. फोनमध्ये असलेली 4 जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजी 12जीबी रॅम पर्यंत पावर देते.
  • बॅक कॅमेरा: फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यात एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे.
  • फ्रंट कॅमेरा: सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी Redmi 13C 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी: पावर बॅकअपसाठी इस रेडमी फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. तसेच मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी यात 18 वॉटची फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे.
  • अन्य फिचर्स : सिक्योरिटीसाठी रेडमी 13सी मध्ये रिअर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर मिळतो. यात 3.5एमएम जॅक, ब्लूटूथ 5.1, आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट सारखे फिचर्स पण आहेत. फोनची थिकनेस 8.09एमएम आणि वजन 192 ग्रॅम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here