Xiaomi च्या सब-ब्रँड रेडमीनं भारतीय बाजारातील बदलतं वातावरण बघून आधीच सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन सादर केला होता. हा स्मार्टफोन Redmi 11 Prime 5G नावानं बाजारात उपलब्ध आहे. आता या 5000mAh बॅटरी, 6GB रॅम आणि 50MP कॅमेरा असलेला रेडमी फोनवर बंपर डिस्काउंट दिला जात आहे. यात बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरचा देखील समावेश आहे.
Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन 7 5G बँड्सना सपोर्ट करतो. हा फोन मीडियाटेकच्या Dimensity 700 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. यात 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. पुढे आम्ही तुम्हाला रेडमी 11 प्राइम 5जी स्मार्टफोनवर मिळणाऱ्या डील्सची सविस्तर माहिती दिली आहे. डील आणि डिस्काउंटसह या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स देखील पाहा. हे देखील वाचा: My Scheme Portal Online Process: खास तुमच्यासाठी कोणती सरकारी योजना आहे सांगेल ‘ही’ वेबसाइट, आताच करा चेक
Redmi 11 Prime 5G ऑफर्स
Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन अॅमेझॉनच्या वेबसाइटवर 13,999 रुपयांच्या बेस किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे. रेडमीच्या या स्मार्टफोनवर वेगवेगळ्या बँक डिस्काउंट ऑफर करत आहेत. या फोनवर HDFC बँक क्रेडिट कार्डवर 750 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तर American Express आणि बँक ऑफ बडौदाच्या कार्डवर 7.5 टक्के म्हणजे 1294 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तसेच जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून हा रेडमी स्मार्टफोन आणखी स्वस्तात विकत घेता येईल.
Redmi 11 Prime 5G चे स्पेसिफिकेशन्स
- 6.58-इंच FHD+ 90Hz LCD डिस्प्ले
- MediaTek Dimensity 700 प्रोसेसर
- 6GB पर्यंत RAM आणि 128GB स्टोरेज
- 5,000mAh बॅटरी, 18W चार्जिंग
- 50MP + 2MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप
- 8MP सेल्फी कॅमेरा
- Android 12 ऑपरेटिंग सिस्टम
- IP52 सपोर्ट
Redmi 11 Prime 5G स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा Full-HD+ LCD डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे. या फोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आणि कोर्निंग ग्लास प्रोटेक्शनसह येतो. या फोनमध्ये MediaTek Dimensity 700 SoC सह 6GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. ही स्टोरेज 1TB पर्यंत मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी, 18W चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: December OTT Releases: लॉकडाउन मधील हाल दाखण्यासाठी येतेय सीरिज; पाहा आगामी रिलीजची यादी
Redmi 11 Prime 5G स्मार्टफोनचा कॅमेरा सेटअप पाहता फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेन्सर मिळतो. या फोनच्या फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन Android 12 वर आधारित MIUI 13 वर चालतो. या फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक आणि IR ब्लास्टर देण्यात आला आहे.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.
