December OTT Releases: लॉकडाउन मधील हाल दाखण्यासाठी येतेय सीरिज; पाहा आगामी रिलीजची यादी

थिएटरमध्ये फ्लॉप झालेल्या चित्रपटांना ज्या पद्धतीनं ओटीटीवर प्रतिसाद मिळत आहे ते पाहून दर्शकांची पसंती ऑनलाइन प्लॅटफॉर्मला आहे हे दिसतं. आता वर्ष संपत आलं आहे, परंतु वर्षाचा शेवटचा महिना देखील भरपूर एंटरटेनमेंट घेऊन येत आहे. December मध्ये कार्तिक आर्यनचा फ्रेडी, अमिताभ बच्चनचा गुडबाय, मोहनलालचा मॉन्स्टर, मधुर भंडारकरची इंडिया लॉकडाउन आणि विक्की कौशलचा गोविंदा नाम मेरा चित्रपट रिलीज होणार आहेत. पुढे आम्ही डिसेंबर ओटीटी रिलीज डेट आणि टाइमची माहिती दिली आहे.

December OTT Releases

  • Freddy
  • India Lockdown
  • Monster Blurr
  • Good Bye
  • Govinda Mera Naam
  • Cat
  • Vadhandhi: The Fable of Velonie
  • Moving In With Malaika

Freddy

जर तुम्ही कार्तिक आर्यनचे फॅन असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कार्तिकचा ‘फ्रेडी’ चित्रपट थेट ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर 2 डिसेंबरला रिलीज होईल. हा एक साइकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन शशांक घोष यांनी केलं आहे. फ्रेडी एक अशा डेंटिस्टची गोष्ट आहे, ज्याला एकांत आवडतो आणि म्हणून तो कोणताही मिसळत नाही. हे देखील वाचा: 200MP कॅमेरा असलेल्या Samsung Galaxy S23 Series च्या लाँचचा मुहूर्त ठरला; जाणून घ्या तारीख

India Lockdown

लॉकडाउन हा शब्द अनेकांना अजूनही घाबरवतो. या काळात लोकांचे झालेले हाल दाखवण्यासाठी अजून एक वेब सीरीज India Lockdown रिलीज होणार आहे. यात श्वेता बसु प्रसाद, आहना कुमार, प्रतीक बब्बर, सई ताम्हणकर आणि प्रकाश बेलावडे अशा कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

Monster

जर तुम्ही दाक्षिणात्य चित्रपटांचे चाहते असाल तर सुपर स्टार मोहन लालचा चित्रपट Monster ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होईल आणि मल्याळम, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत स्ट्रीम करता येईल. ‘मॉन्स्टर’ मध्ये मोहनलाल एका सिख व्यक्तीची भूमिका साकारत आहे. चित्रपट 21 ऑक्टोबरला मोठ्या पडद्यावर रिलीज झाला आहे आणि 2 डिसेंबरला ओटीटीवर येईल.

Blurr

सस्पेंसनं भरपूर असलेला तापसी पन्नूचा नवा चित्रपट ‘ब्लर’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्म Zee5 वर रिलीज केला जाईल आणि 9 डिसेंबर पासून झी5 वर स्ट्रीम करता येईल. चित्रपटाच्या ट्रेलरवरून समजते की तापसीची चित्रपटात दुहेरी भूमिका आहे, ज्यात ती गायत्री-गौतमी असे दोन पात्र करत आहे. तापसीनं या चित्रपटात फक्त अ‍ॅक्टिंग केली नाही तर चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे.

Good Bye

BIG B म्हणजे अमिताभ बच्चन यांचा चित्रपट Good Bye ओटीटीवर रिलीजसाठी तयार आहे. या चित्रपटात अमिताभ सोबतच रश्मिका मंदाना आणि नीना गुप्ता यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 2 डिसेंबरला Netflix वर स्ट्रीम केली जाईल. तसेच पुष्पा अ‍ॅक्ट्रेस रश्मिका मंदाना या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदीत पदार्पण करेल. गुडबाय 7 ऑक्टोबरला चित्रपटगुहांमध्ये आला होता.

Govinda Mera Naam

कॉमेडी थ्रिलर असा चित्रपट गोविंदा नाम मेरा ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर येत आहे. जो 16 डिसेंबरला रिलीज केली जाईल. हा थेट -टू-ओटीटी रिलीज केला जात आहे आणि याचे दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केलं आहे, तर निर्माता करण जौहर आहे. चित्रपटात विक्की कौशलसह कियारा आडवाणी आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Cat

बॉलीवुड अभिनेता रणदीप हुड्डाची अ‍ॅक्शन आणि क्राइम थ्रिलर सीरीज ‘कॅट’ Netflix वर 9 डिसेंबरला रिलीज केली जाईल. या सीरिजमध्ये रणदीपनं एका गुप्तहेराची भूमिका केली आहे. ‘कॅट’ सीरिज पंजाबी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये रिलीज होईल.

Vadhandhi: The Fable of Velonie

साउथचे चित्रपट आवडणाऱ्या लोकांसाठी आणखी एक चित्रपट डिसेंबरयामध्ये येतोय. ही एक दक्षिण भारतातील क्राइम थ्रिलर सीरीज आहे. ‘वधांधी- द फेबल ऑफ वेलोनी’ एक तामिळ क्राइम थ्रिलर आहे, परंतु ओटीटीवर ही तेलुगु, मल्याळम आणि कन्नडसह हिंदीत स्ट्रीम करता येईल. हा थ्रिलर ड्रामा प्राइम व्हिडीओ वर 2 डिसेंबरला रिलीज होईल. हे देखील वाचा: 12 नव्हे 13 महिने चालेल BSNL चा ‘हा’ प्लॅन; एयरटेल-जियोपेक्षा कमी किंमत आणि रोज 2GB डेटा

Moving In With Malaika

Moving In With Malaika एक नवीन टीव्ही सीरीज असेल जी 5 डिसेंबर, 2022 पासून सोमवार-गुरुवारपर्यंत स्ट्रीम करता येईल. रिपोर्ट्सनुसार हा शो 16 एपिसोडमध्ये टेलीकास्ट केला जाईल, ज्यात Malaika चे मित्र परिवारासह इतर अनेक पाहुणे असतील. हा रियलिटी शो ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here