स्वस्त ओप्पो मोबाईल A1i झाला चीनमध्ये लाँच, जाणून घ्या कसे आहेत स्पेसिफिकेशन आणि किती आहे किंमत

ओप्पोने आपल्या होम मार्केट चीनमध्ये ‘ए’ सीरिजचा विस्तार करत दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे डिव्हाईस OPPO A1s आणि OPPO A1i नावाने लाँच झाले आहेत. तसेच लो बजेट ओप्पो मोबाईल ए 1आई ची किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशनची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

OPPO A1i ची किंमत

  • 8GB RAM + 256GB Storage = 1099 Yuan (₹12,500 रुपये)
  • 12GB RAM + 256GB Storage = 1199 Yuan (₹13,900 रुपये)

ओप्पो ए1आई स्मार्टफोन चीनमध्ये दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. याच्या 8 जीबी रॅम मॉडेलची किंमत 1099 युआन आहे जी भारतीय चलनानुसार 12,500 रुपयांच्या आसपास आहे. तसेच फोनचा मोठा व्हेरिएंट 12 जीबी रॅमला सपोर्ट करतो तसेच याची किंमत 1199 युआन म्हणजे 13,900 रुपयांच्या आसपास आहे. हा फोन चीनमध्ये Night Black आणि Phantom Purple कलरमध्ये विकला जाईल.

OPPO A1i चे स्पेसिफिकेशन

  • 6.56″ HD+ 90Hz Display
  • Mediatek Dimensity 6020
  • 12GB RAM + 256GB Storage
  • 13MP Back Camera
  • 5MP Front Camera
  • 10W 5,000mAh Battery

स्क्रीन : ओप्पो ए 1 आई स्मार्टफोनमध्ये 6.56 इंचाचा पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. ही एचडी+ रेजोल्यूशन वाली स्क्रीन आहे जी आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 90 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते.

प्रोसेसर : Oppo A1i मध्ये प्रोसेसिंगसाठी 7 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक ​डाइमेनसिटी 6020 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.2 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये माली-जी 57 जीपीयू देण्यात आला आहे.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी या ओप्पो मोबाईलच्या बॅक पॅनलवर जिथे 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे, सेल्फी काढणे तसेच रिल्स बनवण्यासाठी ओप्पो ए 1 आई 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी ओप्पोचा नवीन स्मार्टफोन ए 1 आई 5,000 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. तसेच या मोठ्या बॅटरी सोबतच मोबाईलमध्ये 10 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट पण मिळतो.

इतर फिचर्स : Oppo A1i ड्युअल सिम फोन आहे ज्यात ब्लूटथ आणि वायफाय सारखे बेसिक कनेक्टिव्हिटी फिचर्स आहे. तसेच सिक्योरिटीसाठी यात साईट माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर पण मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here