काही दिवसांपूर्वी 91 मोबाईलने ही माहिती दिली होती की लवकरच ओप्पो भारतीय बाजारात ओप्पो ए 3 एक्स (OPPO A3x) मॉडेलला सादर करू शकतो. तसेच आज आम्ही या फोनचे सर्व मॉडेल आणि किंमत एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे. भारतीय बाजारात ओप्पो ए 3 एक्स ला तीन मॉडेलमध्ये सादर केले जाईल आणि ज्याची प्रारंभिक किंमत 12,999 रुपये असेल. हा फोन कंपनीचे जुने मॉडेल ओप्पो ए 18 आणि ए 59 ला रिप्लेस करेल.
OPPO A3x 5G ची किंमत
OPPO A3x 5G ला या महिन्याच्या शेवटी भारतात लाँच केले जाणार असल्याची संभावना आहे. परंतु फोनच्या लाँच पूर्वीच याच्या किंमतीची माहिती आम्हाला एक्सक्लूसिव्ह मिळाली आहे. माहितीनुसार हा फोन तीन व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाईल. OPPO A3x च्या 4GB+64GB व्हेरिएंटची किंमत 12,499 रुपये, 4GB+128GB व्हेरिएंटची किंमत 13,499 रुपये आणि टॉप व्हेरिएंट 6GB+128GB ची किंमत 15,499 असेल. आम्हाला ही माहिती ऑफलाईन रिटेल स्टोरच्या माध्यमातून मिळाली आहे. लीक माहितीनुसार, 4 जीबी रॅम असणारे दोन्ही मॉडेल जुलैच्या शेवटी भारतात येतील. तसेच 6 जीबी रॅम असलेला मॉडेल ऑगस्टपर्यंत येण्याची शक्यता आहे.
OPPO A3x चे स्पेसिफिकेशन
OPPO A3x च्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर लीकच्या माध्यमातून आतापर्यंत जी माहिती आली आहे त्यानुसार फोनला कंपनी पॉलीकार्बोनेट प्लास्टिक बॉडीसह सादर केले जाईल. हा फोन खूप स्लिक असेल आणि याची जाडी फक्त 7.68 एमएम असू शकते.
तसेच फोनच्या डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला 6.67 इंचाची एचडी प्लस स्क्रीन मिळेल. फोनमध्ये 120 हर्ट्स स्क्रीन रिफ्रेश रेट पाहायला मिळू शकते. तसेच लीकच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी याला मिलिट्री ग्रेड शॉक रजिस्टेंट आणि मल्टीपल लिक्विड रजिस्टेंस सर्टिफिकेशन सह सादर करू शकते. हा फोन अँड्रॉईड 14 वर आधारित कलर ओएस 14 वर रन करेल.
तसेच याचा कॅमेरा ओप्पो ए3 एक्सला कंपनी ड्युअल रिअर कॅमेऱ्यासह सादर करू शकतो. कंपनी याला 8 एमपीच्या फ्लिकर ब्राईटनेस सेन्सरसह सादर करू शकते. परंतु दुसऱ्या सेन्सरबद्दल सध्या माहिती नाही. तसेच या फोनमध्ये तुम्हाला 5 एमपीचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळू शकतो.
फोनच्या प्रोसेसर बाबत माहिती उपलब्ध आहे. कंपनी ओप्पो ए 3 एक्सला मीडियाटेक डायमेंसिटी 6300 एसओसी सह सादर करू शकते, जो की 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. तसेच फोनमध्ये तुम्हाला 4 जीबी आणि 6 जीबीची रॅम पाहायला मिळू शकते. तसेच यात तुम्हाला 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज पाहायला मिळू शकते.
या फोनमध्ये तुम्हाला 5,100 एएमएचची बॅटरी पाहायला मिळू शकते, जो की 45 वॉटच्या फास्ट चार्जरसह येईल.














