Oppo नं काही दिवसांपूर्वी आपला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन Oppo K10 5G सादर केला होता. हा डिवाइस आता ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर सध्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. फ्लिपकार्टवर इलेक्ट्रिॉनिक्स सेल 17 जुलै पर्यंत सुरु आहे. सेलमध्ये ओप्पोच्या या डिवाइससह अन्य स्मार्टफोन्स देखील स्वस्तात विकत घेता येतील. तसेच सोबतीला अनेक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. फ्लिपकार्टवर सुरु असेलल्या सेलमध्ये Oppo K10 5G स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. हा स्मार्टफोन 48MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप, 5000mAh बॅटरी आणि Mediatek Dimensity 810 प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे.
Oppo K10 5G वरील ऑफर्स
Oppo K10 5G स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर 17,499 रुपयांमध्ये विकला जात आहे. ओप्पोच्या या फोनमध्ये बँक ऑफ बडौदाच्या क्रेडिट कार्डवर 1500 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन फक्त 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच SBI च्या क्रेडिट कार्डवर 500 रुपये, EMI ट्रांसजेक्शनवर 1500 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. इतकेच नव्हे तर ओप्पोचा हा 5G स्मार्टफोनसोबत तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून अतिरिक्त सूट मिळवू शकता. हे देखील वाचा: जगातील सर्वात मोठा फोन कॅमेरा! पाहा 200MP सेन्सरचे कॅमेरा सॅम्पल; शाओमी-सॅमसंगच्या अडचणीत वाढ
OPPO K10 5G स्पेसिफिकेशन्स
- 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.56-इंच HD+ LCD पॅनल
- MediaTek Dimensity 810 प्रोसेसर
- 5,000mAh बॅटरी, 33W फास्ट चार्ज
- 8GB + 5GB रॅम, 128GB स्टोरेज
- 48MP + 2MP ड्युअल रियर कॅमेरा
- 8MP सेल्फी कॅमेरा
- Android 12 आधारित ColorOS 12.1
OPPO K10 5G स्मार्टफोनमध्ये 6.56-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये LCD डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. प्रोसेसिंग पावरसाठी कंपनीनं MediaTek च्या Dimensity 810 चिपसेटचा वापर केला आहे. सोबतीला OPPO K10 5G स्मार्टफोनमध्ये 128GB की स्टोरेज आणि 8GB रॅम मिळतो. वर्चुअल रॅम फिचरच्या मदतीनं 5GB पर्यंत अतिरिक्त रॅम मिळवता येते. हे देखील वाचा: SAMSUNG 5G फोनवर बंपर डिस्काउंट; स्वस्तात 50MP कॅमेरा आणि Snapdragon 750 प्रोसेसर
OPPO K10 5G च्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 48MP चा आहे, जोडीला 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ओप्पोच्या या फोनमध्ये फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. OPPO K0 5G स्मार्टफोन Android 12 वर आधारित Color OS 12.1 वर चालतो. यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 33W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
