जगातील सर्वात मोठा फोन कॅमेरा! पाहा 200MP सेन्सरचे कॅमेरा सॅम्पल; शाओमी-सॅमसंगच्या अडचणीत वाढ

काही दिवसांपूर्वीच 91मोबाईल्सनं बातमी दिली होती लवकरच 200MP कॅमेरा असलेला Motorola Edge 30 Ultra जागतिक बाजारात लाँच होणार आहे. जोडीला आम्ही या फोनचे काही स्पेसिफिकेशन देखील लीक केले होते. तर आज मोटोरोला एज 30 अल्ट्राबाबत मोठी माहिती समोर आली आहे. कंपनीनं फोनच्या 200MP कॅमेऱ्यातून घेण्यात आलेला फोटो शेयर केला आहे त्यावरून फोटोच्या क्वॉलिटीचा अंदाज घेऊ शकता. हा फोटो चीनमध्ये मोटोरोलाचे जनरल मॅनेजर Chen Jin यांनी शेयर केला आहे. त्यांनी चीनी सोशल नेटवर्किंग साईट विबोवर हा फोटो टाकला आहे जिथे त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

अलीकडेच कंपनीनं माहिती दिली आहे की नवीन Motorola Edge 30 Ultra मध्ये Samsung चा 200MP ISOCELL HP1 सेन्सरचा वापर केला जाईल. त्यामुळे स्पष्ट झाला आहे की कंपनी आतापर्यंतचा सर्वात मोठा कॅमेरा असलेला फोन घेऊन येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा फोन या महिन्यात चीनमध्ये Moto X30 Pro नावानं लाँच केला जाऊ शकतो. हा जगातील सर्वात पहिला फोन असेल ज्यात 200MP चा कॅमेरा मिळेल.

Motorola 30 Ultra चे कॅमेरा सॅम्पल

कंपनीद्वारे जी इमेज शेयर करण्यात आली आहे त्यानुसार हा फोटो 50MP रिजोल्यूशनवर क्लिक करण्यात आला आहे जो 4-in-1 pixel प्रोसेसिंगच्या मदतीनं 200MP च्या बरोबरीचा फोटो घेतो. सोशल मीडियावर ही इमेज शेयर करण्यात आल्यामुळे ही खूप कम्प्रेस्ड आहे असे असूनही क्वॉलिटी खूप चांगली म्हणता येईल. याबाबत मोटोरोला एक्सक्युटीव्ह म्हणाले आहेत की नवीन 4-in-1 pixel processing टेक्नॉलॉजी जुन्या 9-in-1 टेक्नॉलॉजीपेक्षा खूप चांगली आहे जिचा वापर आम्ही 108 मेगापिक्सल कॅमेऱ्यासाठी Moto G200 मध्ये केला होता. 9-in-1 पिक्सल प्रोसेसिंगसाठी कंपनीनं 13 एमपी कॅमेरा सेन्सरचा वापर केला होता.

Motorola Edge 30 Ultra चे स्पेसिफिकेशन

Motorola Edge 30 Ultra चे आतापर्यंत काही लीक्स आले आहेत. काही दिवसांपूर्वी Motorola Frontier नावाचा एक फोन काही सर्टिफिकेशन साईटवर दिसला होता. हाच डिवाइस Motorola Edge 30 Ultra नावानं कंपनीनं बाजारात सादर करू शकते, अशी चर्चा आहे. हा फोन चिनी सर्टिफिकेशन साईट 3C वर लिस्ट झाला होता, त्यानुसार या फोनमध्ये 125 वॉट फास्ट चार्जिंग मिळू शकते, तसेच अन्य स्पेसिफिकेशन देखील खूप दमदार आहेत.Motorola Edge 30 Ultra मध्ये तुम्हाला 4,500mAh जी बॅटरी मिळू शकते जी 125W चार्जिंगसह येईल. तसेच फोटोग्राफीसाठी 200MP च्या प्रायमरी लेन्ससह 50MP चा अल्ट्रावाईड आणि 12MP डेप्थ सेन्सर असू शकतो. तसेच या फोनमध्ये एज 30 प्रो प्रमाणेच 60MP चा फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

नवीन लीकमध्ये स्क्रीन साइज बद्दल थोडा फर्ज दिसत आहे. 6.73-इंचाच्या स्क्रीनची माहिती मिळाली होती. अभिषेकनं दिलेल्या स्पेक्सनुसार फोनमध्ये 6.67 इंचाची स्क्रीन मिळू शकते. जुन्या लीकनुसार कंपनी AMOLED डिस्प्ले पॅनलचा वापर करू शकते आणि यात 144Hz रिफ्रेश रेटसह HDR 10+ सपोर्ट मिळू शकतो.

प्रोसेसर बाबत कोणताही खुलासा केला गेला नाही परंतु कंपनी हा हँडसेट Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह सादर करू शकते, कारण हा फोन 2022 मधील कंपनीचा सर्वात शक्तिशाली फोन असेल आणि 8+ जेन 1 सध्या मोबाईल डिवाइससाठी सर्वात शक्तिशाली प्रोसेसर पैकी एक आहे. कंपनीचा Motorola Edge 30 Pro स्मार्टफोन भारतात तसेच जगभरात Qualcomm Snapdragon 8 Gen 1 सह येणारा पहिला फोन होता. त्यामुळे यावेळी देखील कंपनी शक्तिशाली प्रोसेसरची निवड करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here